पुणे व नगर जिह्यात धुमाकूळ घालणारे दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे–पुणे व नगर जिह्यात धुमाकूळ घालणाऱया दोन अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर साथीदारांसोबत घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय 26 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) दीपक उर्फ आशिक आझाद काळे (वय 25 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरफोडीचा तपास सुरू असताना वरील आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यातील आरोपी विशाल ऊर्फ कोंग्या काळे हा टाकळीहाजी परिसरात येणार असल्याची खबऱयामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याठिकाणी आलेल्या वरील वरील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी पुणे व नगर जिह्यात आठ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश