पुणे(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारी महिन्यात अवघड होणार आहे. काँग्रेस(Congress), उद्धव ठाकरे गट(Uddhav Thakaray), शरद पवार(Sharad Pawar) गट यांच्या पक्षातील जेवढे लोक भाजपात (bjp) येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा (Lotus Dupatta) तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला. मराठा समाजाला (Maratha) फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे आरक्षण(Reservation) सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. (Lotus dupatta is ready for those coming to BJP)
फर्ग्युसन महाविद्यालयात ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे (National Book Trust) आयोजित पुणे पुस्तक महोत्सवा’ला (Pune Book Festival) बावनकुळे भेट दिल्यानंत दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बावनकुळे म्हणाले, मराठा समाजाला फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे आरक्षण सरकारकडून दिले जाईल. मराठा समाजाला पुन्हा कोणत्याही प -कारच्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये, याची काळजी सरकार घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाबाबत आग्रही असून ते मराठा समाजाला नक्कीच आरक्षण देतील, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य ती दखल घेतली असून सरकार त्यावर काम करत आहे.
राज्यात दारू विक्रीसाठी वर्षाअखेरीस राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, मी सदर विभागाचा तीन वर्षे मंत्री होतो. त्यामुळे मला अनेक गोष्टींची माहिती आहे. राज्यात दारू बंदी केली जाते, त्याठिकाणी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असते. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकार कधी-कधी अशाप्रकारची पावले उचलते. ज्याला दारू घ्यायची आहे, तो घेणारच आहे. ज्याला प्यायची आहे तो पिणारच आहे, परंतु पिताना व घेताना या दोघांना अडचणी निर्माण होतात, त्यात विषारी दारूचे प्रकार घडल्याने अशाप्रकारे निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.