gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Image

डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Spread the love

पुणे- – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पुरस्काराची घोषणा केलीस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

13 ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा सोहळा होणार आहे. दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी दि. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात होणार्‍या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. यंदाचा समारंभ 13 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.पुरस्काराचे यंदाचे 38वे वर्ष

अधिक वाचा  एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास शरद क्रीडा-सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पाठींबा

पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

पुरस्काराचे यंदाचे 38वे वर्ष आहे. 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या वर्षी पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

राज ठाकरे यांचा घणाघात : “जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात” :

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप

Spread the love

Spread the love पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

by News24Pune time to read: <1 min
0