फुकटची बिर्याणी महिला डीसीपीला पडली महागात : व्हायरल ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-बिर्याणी खाण्याची इच्छा झाली. मात्र, बिर्याणीचे हॉटेल आपल्या हद्दीत आहे मग बिर्याणीचे पैसे कशाला द्यायचे.. असे संभाषण असलेल्या पुणे पोलिस दलातील महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिस उपायुक्त असलेल्या या महिला अधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेत याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या येथे नॉनव्हेज खूप चांगले मिळते  असं ती म्हणत होती मला, कुठे मिळते अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाळी असे सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे असल्याचे विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातील, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत. नल्ली निहारी म्हणून एक प्रकार असल्याचे सांगतो. तसेच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातील पण चांगली आहे. कलर वगैरे नसते त्यात असेही सांगतो.

महिला अधिकारी यावर बरे जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या, मॅडमने सांगितले म्हणून. मी बोलू का पीआयला असे विचारतात. यावर कर्मचारी नाही, मॅडम करतो मी असे सांगतो. त्याच्या हद्दीतील आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?,” अशी विचारणा महिला अधिकारी करते.

यापूर्वी आपण असे कधी केले नव्हते त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो, असे पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे? असे विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असे सांगतो. तेवढे करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता, एक हॉटेल आहे म्हणून…तेवढे करेल तो..त्याच्यात काय एवढे? नाहीतर दुसरे कोणी असेल..किंवा मी सांगते, असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम, मी सांगतो असे उत्तर देतो.

महिला अधिकारी ऑडिओ क्लिपच्या शेवटी म्हणतात की, त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतो ना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतील गोष्टीसाठी कोणी पैसे पे करते का?..मला माहीत नाही.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी विचारले असता ते म्हणाले ‘ मी देखील ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे. ही गंभीर बाब आहे. पोलीस आयुक्तांना मी चौकशी करून अहवाल देण्याविषयी सांगितले आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल, असे सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *