पुणे – अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या रविवारी आपल्या समर्थक आठ आमदारांसह भाजपशी हात मिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे खंदे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) तसेच मातब्बर नेते छगन भुजबळ (Chagan भुजबळ) ,दिलीप वळसे पाटील(Dilip Valase Patil) सुनील तटकरे (Sunil Tatkare) राष्ट्रीय स्तरावरचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) अजित पवारांच्या गोटात सामील झाल्याने राष्ट्रवादीमध्ये (ncp) मोठा हल्लकल्लोळ झाला. एक-सव्वा वर्षावर विधानसभेची निवडणूक आलेली असताना तसेच राज्यातील सरकार स्थिर असताना भाजपला अजित दादा यांची गरज का लागली किंबहुना एक वर्षांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊंन एक वर्षानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी का केली? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे (Karjat- Jamkhed) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्टीकरण देत मोठा गौप्य स्फोट केला आहे. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबर 2023 मध्येच होतील असे भाकीत त्यांनी ‘मुंबई Tak’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्तवले आहे. याबाबत त्यांनी अनेक गोष्टींचा संदर्भ दिला आहे. (Lok Sabha and Vidhan Sabha elections in December?
भाजपला आपल्या जागांचा आकडा कमी होण्याची भीती वाटत असून त्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण तर राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गोठवण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.(Political Crisis In NCP)
ते म्हणाले, येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या जागांचा आकडा कमी व्हायला नको यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊन प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसाठी मार्च 2024 आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. कारण डिसेंबर 2023 मध्येच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक होतील असे ते म्हणाले.
या दोन्ही निवडणुका डिसेंबर 2023 मध्ये होतील असे ठामपणे सांगताना त्याबाबत त्यांनी अनेक गोष्टींचा संदर्भ दिला आहे . ते म्हणाले, सध्या भाषणांचा स्पीड वाढला आहे तसेच फोडाफोडीचाही स्पीड वाढला आहे. आता सर्व आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आहेत. सध्या सत्ता स्थापन करायची नाहीये. मग तुम्हाला आमदारांना हॉटेलमध्ये का घेऊन जावं लागलं? त्यांच्यावर विश्वास नाही का? असे प्रश्न उपस्थित करून या सर्व गोष्टी डिसेंबर महिन्यामध्ये निवडणूक होणार आहेत म्हणून केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. कर्नाटकात जे झाले ते एक कारण आहेच. त्यामुळे भाजपचे आकडे कमी होऊ शकतात तसेच मध्यप्रदेशचेही वातावरण फार वेगळे आहे. तेलंगणतील बीआरएस महाराष्ट्रात येत आहे. तर दुसरीकडे तेलंगणामध्ये त्यांच्या घराला आग लागली आहे. त्याचवेळी तिकडे राहुल गांधींच्या सभांना पाच- पाच लाखांची गर्दी होत आहे. त्यामुळे संपूर्ण वातावरणात बदल होत आहे आणि याचा अंदाज भाजपाला चांगला आला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपला आकडा कमी व्हायला नको यासाठी कुठल्याही थराला जाण्या जातांच प्रयत्न आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, आणि तेलंगना या पाच राज्यांच्या निवडणुकांबरोबरच लोकसभा निवडणुका घेण्याची त्यांची घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी ते काहीही कारण सांगतील परंतु, आणखी नुकसान व्हायला नको म्हणून डिसेंबर मध्ये निवडणुका होतील आणि त्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण तर राष्ट्रवादीचे घडयाळ चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, त्यांना असे वाटते की ते सहजपणे निवडून येतील परंतु महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही इतके सोपे समजू नका असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
ते पुढे म्हणाले निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन लागतात. जेव्हापासून ईव्हीएम मशीन आले तेव्हापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येण्याअगोदर पाच महिने आधी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘कॅलिब्रेशन रिपोर्ट’ तयार करण्यासाठी सांगितले जाते. संपूर्ण देशात तशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. हे कॅलिब्रेशन महाराष्ट्रात सहा दिवसांपूर्वी सुरू झाले आहे महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुका नाहीत. मग असे असताना हे कॅलिब्रेशन सुरू झाले आहे यावरून आपल्याला अंदाज येतो. आसपासच्या राज्यांमध्येही अगदी कर्नाटकातही सुरू झाले आहे. ही तयारी का सुरू आहे? त्याचा विचार जर आपण केला तर पाच महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या डिसेंबर मध्येच होतील . त्यादृष्टीनेच राज्यात ही सगळी जी गडबड केली आहे. त्यामध्ये अर्थ व्यवहार झाला असेल, दबाव तंत्राचा वापर झाला असेल किंवा असेल काही नेत्यांमध्ये मतपरिवर्तन झाले असेल, हे सर्व निवडणुकांसाठी झाले आहे असे त्यांनी म्हटलं आहे.
Lok Sabha and Vidhan Sabha elections in December? | Ajit Pawar |Sharad Pawar | Political Crisis In NCP | Rohit Pawar |