पुण्यात लॉकडाऊन की एप्रिलफूल? – अजित दादांच्या निर्णयाकडे लक्ष


पुणे- सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल आणि लॉकडाऊनचा निर्णय  घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या शुक्रवारी पुणेकरांना दिला होता. याबाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, याला कोणी एप्रिल फूल समजू नये असेही पवार म्हणाले होते. आता उद्या (2 एप्रिल) अजित पवार पुण्यातील लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन होणार की एप्रिलफूल होणार हे उद्या(शुक्रवार) होणाऱ्या बैठकीत समजेल.

सध्या कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि वाढणारी रुग्णसंख्या याला आला घालायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांसह सर्वांनीच मांडले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा अन्यथा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पवार यांनी दिला होता.

अधिक वाचा  निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन लावण्यासाठी विरोधीपक्ष भाजपसह व्यापारी, हातावर पोट असणारे व्यावसायिक आणि सर्वच थरातून विरोध होत आहे.

मागील वर्षी असाच कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. त्यानंतर हळूहळू अनलॉक केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात एका दिवसाला सुमारे 30 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे.

अधिक वाचा  पीडीसीसी बँकेच्या तब्बल 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून : आरबीआयने नोटा बदलून नकार दिल्याने बँकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच नियोजन करण्याचे निर्देशदिले होते. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, या लॉकडाऊनचं स्वरुप 50 टक्के लॉकडाऊन आणि 50 टक्के निर्बंध असे असतील असे म्हटले जात आहे.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love