पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही शहरांबाबत निर्णय लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल,असे मुख्यमंत्र्यांचं म्हणणे आहे. दरम्यान, उद्या पुन्हा राज्यातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. यानंतर लॉकडाऊन की आणखी कठोर निर्बंध लागू करायचे याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .

राज्यात काल तब्बल ३० हजार ५३५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने राज्याची वाटचाल ही बिकट परिस्थितीकडे होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला असला तरी मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचं भाष्य केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि अंमलबजावणी राज्यात होत आहे. आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी  ८५ टक्के लक्षण विरहित आहे. ०.४ टक्के मृत्युदर आहे. परंतु, याचवेळी मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रोज सरासरी ३ लाख लसीकरण होत आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २००टक्के आहे. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी.आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत रविवारी बोलणे झाले आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *