Online TET Exam.|शिक्षक पात्रता परीक्षा आता ऑनलाइन

Teacher Eligibility Test Now Online
Teacher Eligibility Test Now Online

First Online TET Exam.–महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱया शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा ( First Online TET Exam.) घेतली जाणार आहे. तसेच टीईटी परीक्षेच्या (TET Exam) जाहिरातीचे काम पूर्ण झाले आहे.  जानेवारी महिन्यात परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली जाणार आहे. (Teacher Eligibility Test Now Online)

राज्यात सध्या शिक्षक भरतीचे (Teacher Recruitment) वारे वाहत आहेत. डिसेंबर महिना अखेरीस राज्य भरातील शिक्षक भारतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक (Teacher) होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा (TET Exam) बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) फेब्रुवारी 2024 मध्ये पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा (घेतली जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षा या ऑफलाईन अर्थात ओएमआर शीट वर घेतल्या जात होत्या. परंतु, इतर परीक्षाप्रमाणे टीईटीदेखील आता ऑनलाईन घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रांच्या तारखा मिळवण्याचे काम सुरू आहे.

अधिक वाचा  आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन : चंद्रकांत पाटलांचा कंठ आला दाटून

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (Dr. Nandakumar Bedse) म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणाऱया परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परीक्षेची जाहिरात येत्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. सध्या परीक्षा घेणाऱया एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 राज्यात सर्वत्र विविध पदांच्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. तसेच मार्च महिन्यात विविध व्यासाईक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच टीईटी परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी परीक्षा सेंटर मिळणे अडचणीचे होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love