गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाहेर


पुणे—महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (maharashtra kesari) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील (pruthviraj patil) याला पराभवाचा धक्का बसला आहे. पुण्याच्या हर्षद कोकाटे (harsahd kokate) कडून जोरदार पराभव झाल्याने पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.

तवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि पुणे शहराचा पैलवान हर्षद कोकाटे यांच्यात गादी विभागात अतिशय चुरशीची लढत झाली हर्षद कोकाटेने भक्कम अशी आघाडी घेत लढतीवर पकड मिळवली उत्तरात पृथ्वीराज पाटील ने ही आक्रमक खेळी करत मध्यंतरापूर्वी तीन गुणांची कमाई केली काटे की टक्कर झालेली या कुस्तीमध्ये कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील दोघेही एकमेकांना वरचढ ठरत होते.  

दोन्ही कुस्तीगिरांना पाठीराखांकडून चेहरा केले जात होते पहिल्या राउंड मध्ये चार तीन अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर पृथ्वीराज पाटीलने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.  हर्षद कोकाटेने भक्कम प्रतिवार करत तीन गुणांनी आघाडी घेतली.  पृथ्वीराज पाटील ने पुन्हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, हर्षद कोकाटेने प्रत्येक आक्रमण परतवून लावत पृथ्वीराजला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.  शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करत हर्षद कोकाटेने नऊ तीन अशा फरकाने ही चुरशीची लढत रंजकपणे जिंकली.

अधिक वाचा  अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनासाठी झटणारे जतरा टाना भगत

क्रीडानगरीत उपस्थित असलेल्या प्रत्येक कुस्ती प्रेमीचे लक्ष या लढतीकडे लागले होते. हर्षदने आपली उंची आणि ताकदीचा पूर्ण उपयोग करून घेत खेळ केला. लढतीच्या सुरुवातीलाच आक्रमक खेळण्याच्या नादात पृथ्वीराजकडून लढत धोकादायक स्थितीत गेली आणि त्याचे पाठोपाठ दोनवेळा दोन गुण हर्षदला मिळाले. त्यानंतर लढत बाहेर गेल्यामुळे पृथ्वीराजला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीनंतर पृथ्वीराजने सातत्याने आपली आक्रमकता कायम ठेवली. मात्र, हर्षदने आपला बचाव भक्कम ठेवत त्याला निराश केले. हर्षदने पुढे ही आघाडी आणखी भक्कम करत सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुणे जिल्हा संघाच्या ताकदवाना हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलला गुणांवर मात देत ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली. आपली घोडदौड कायम ठेवण्यासाठी हर्षदला उद्या शिवराज राक्षेचे आव्हान परतवून लावावे लागेल.

अधिक वाचा  जगातील सर्वाच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर समाेर हेलिकाॅप्टरमधून पदमश्री शीतल महाजन मारणार ऐतिहासिक पॅराशूट जंप : जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ठरणार लँडिग करणारी जगातील पहिली महीला

हर्षवर्धन सरगीरची गादी विभागातून आगेकूच कायम

माजी विजेता हर्षवर्धन सरगीर यानेही गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली आहे. हर्षवर्धनने तिसऱ्या फेरीत समीर शेखचे आव्हान अत्यंत सावध लढतीत ३-० असे संपुष्टात आणले. दरम्यान माती विभागातून माजी विजेता बाला रफिक शेख आणि साताऱ्याचा किरण भगत, लातूरचा शैलेश शेळके यांनी आपली आगेकूच कायम राखली. पुणे शहराच्या पृथ्वीराज मोहोळचे पदार्पण अपयशी ठरले असले, तरी त्याने तिसऱ्या फेरीत शैलेश शेळकेला दिलेली लढत तुल्यबळ ठरली. पृथ्वीराजने आपल्याबद्दलच्या अपेक्षा निश्चित उंचावल्या अशीच प्रतिक्रिया क्रीडानगरीत उमटत होती.

माती गटात लातूरच्या शैलेश शेळकेने लढत जिंकली

माती गटात  पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यातही तुळशीची लढत पाहायला मिळाली.  शैलेश शेळकेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दोन गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली अखेरच्या टप्प्यात पृथ्वीराजने गुणाची कमाई करत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, शैलेशचा जोरदार खेळ आणि बचावात्मक पवित्रा याच्या जोरावर शैलेश शेळकेने अशी ही लढत जिंकली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love