भारलेल्या वातावरणात कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लाखो भीमसैनिकांकडून मानवंदना

Lakhs of Bhima soldiers pay their respects to the historic Victory Pillar at Koregaon Bhima
Lakhs of Bhima soldiers pay their respects to the historic Victory Pillar at Koregaon Bhima

Korgaon Bhima – ‘जय भीम’चा (Jay Bhim) गगनभेदी नारा…ठिकठिकाणी फडकणारे निळे ध्वज…(Blue Flag) वाघोलीपासून (Vagholi) ते पेरणे फाटय़ापर्यंत (Perane Phata) उसळलेला नीलसागर…अन् पावलापावलावर होत असलेला समतेचा जागर…अशा भारलेल्या वातावरणात कोरेगाव भीमा(Koregaon Bhima) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला लाखो भीमसैनिकांकडून सोमवारी मानवंदना देण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहनतळ व बसेसचे नेटके नियोजन, जनतेकडून या सर्वाला मिळालेली शिस्तबद्ध साथ हे यंदाच्या शौर्यदिनाचे वैशिष्टय़ ठरले. दरम्यान, विजयस्तंभावरील(Vijay stambha) आकर्षक सजावट अन् त्यावर हेलिकॉप्टरने(Helicoptar) झालेली पुष्पवृष्टी (Flower shower) यामुळे सोहळय़ाचा आनंद द्विगुणित झाला.

( Lakhs of Bhima soldiers pay their respects to the historic Victory Pillar at Koregaon Bhima)

पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील लाखो अनुयायी दरवर्षी येथे येत असतात. मागच्या काही वर्षांपासून येथील गर्दीत लक्षणीय वाढ होताना दिसत असून, यंदाही 206 व्या अभिवादन सोहळय़ास विक्रमी गर्दी झाल्याचे दिसून आले. यंदाही या परिसरात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाघोलीपासून विजयस्तंभापर्यंत चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा, बेरिगेट्स लावण्यात आले होते. विजयस्तंभ परिसराला तर पोलीस छावणीचेच स्वरूप आले होते. बस, खासगी वाहने, दुचाकीसह मिळेल त्या साधनाने अनुयायी कोरेगाव भीमाच्या दिशेने निघाले होते. अनेकांनी पायी चालत येथे हजेरी लावली. निळे ध्वज, निळय़ा टोप्या ल्यालेला हा जनतारुपी नीलसागरच रस्त्यारस्त्यावर उसळलेला. आकर्षक फुलांनी सजवलेला ऐतिहासिक विजयस्तंभ शोभून दिसत होता. तेथे नतमस्तक होताना प्रत्येकाचाच ऊर भरून येत होता. येथे आलेल्या लाखो बांधवांनी अत्यंत भारावलेल्या वातावरणात विजयस्तंभाला मानवंदना दिली. 

अधिक वाचा  खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका : अजित पवार

महिला, तरुण, वृद्धांचा लक्षणीय सहभाग 

लहान मुले, वृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिलाही शौर्यदिनाच्या या अभिवादन सोहळय़ात हिरिरीने सहभागी झालेले. जोर से बोलो…जय भीम, तथागत गौतम बुद्ध यांचा विजय असो, एकच साहेब…बाबासाहेब, अशा घोषणांनी अवघा आसमंत दणाणून गेलेला. बुद्धम शरणम् गच्छामी, धम्मम शरणम् गच्छामी, संघम् शरणम् गच्छामी, असे सूर ऐकू येताच वातावरणात शीतलतेची लहर उमटत होती. यंदा मागील वर्षीपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. स्थानिकांनीही या वेळी मोलाचे सहकार्य केले. खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. लाखो अनुयायांनी या स्थळी भेट दिल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

आम्ही युद्धाकडून बुद्धाकडे निघालोय….!

पुणे ते कोरेगाव भीमा हे सुमारे 30 किमी इतके अंतर आहे. पुण्यासह राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱयातून आलेले अनुयायी कोरेगाव भीमाच्या परिसरात एकवटत होते. कोरेगाव भीमाच्या दिशेने जाणारे सर्वच रस्ते भीमसैनिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. आम्ही युद्धाकडून बुद्धाकडे निघालोय, अशी भीमसैनिकांची भावना होती. 

अधिक वाचा  'टिकटॉक स्टार' समीर गायकवाडने का केली आत्महत्या?

आठवले, आंबेडकर, अजितदादांकडून अभिवादन 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभस्थळी मानवंदना दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही मानवंदना दिली. 

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 

दरम्यान, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love