दादा सोबत नाहीत म्हणून त्यांना तळ ठोकावा लागतोय : रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका

The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

Rupali Chakankar : “दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of State Commission for Women) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचे नाव न घेता केली. सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच (Ajit dada) निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून त्यांना तळ ठोकावा लागतो आहे असे म्हणत बारामती (Baramati) लोकसभेमध्ये (Loksabha) अजित पवार राष्ट्रवादी गट (Ajit Pawar ncp Group) आणि महायुतीचा(Mahayuti) उमेदवार निवडून येईल,असा दावाही त्यांनी यावेळी केला. (Both the MPs who talk about Dada have been elected because of Dada)

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, अशी टीका नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली होती.  दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजित पवारांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्या पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

अधिक वाचा  गडी एकटा निघाला... : रोहीत पवारांचे ट्वीट

त्या म्हणाल्या, “अजितदादांनी २०२३ मध्ये जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आणि त्या निर्णयासोबत महाराष्ट्राची जनता आली. भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राला आता विकासाचं राजकारण हवं आहे. त्यामुळे जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादा सोबत नाही म्हणून १० महीने तळ ठोकावा लागतोय यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळे निवडून आलेले आहेत. दादांवर बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही. त्यांनी अशा पद्धतीने बोलणं बंद करावं,असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. (Rupali Chakankar’s criticism of Supriya Sule)

अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागे, संघटना बांधावी लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू, दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे. तसेच आगामी निवडणूकीत महायुतीचा विजय होईल,”  असा दावाही  त्यांनी केला.

अधिक वाचा  कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे' करणार नाही- सुप्रिया सुळे

कोणी उभं राहावं, कोणी इच्छुक असावं हा प्रत्येकाचा निर्णय

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे पुण्यातील खडकवासला मतदार संघातून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, शेवटी निवडणुका या स्पर्धा असतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना इच्छा असते ते उभे राहतात, स्वत:च अस्तित्व आजमावतात. त्यामुळे कोणी उभं राहावं, कोणी इच्छुक असावं हा प्रत्येकाचा निर्णय असतो. शेवटी प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे. निवडणुका तशा कशा होतील? त्यामुळे मीच आहे असे होणार नाही. प्रतिस्पर्धी असले पाहिजे, इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, त्याशिवाय लढायलाही मजा येत नाही.

नाना पाटेकर प्रतिस्पर्धी असले तरी लढणार का? असे विचारले असता रुपाली चाकणकर म्हणाल्या, शेवटी अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेकजण राजकारणात आले. त्यांना लोकांनी किती स्वीकारलं नाही स्वीकारलं ही लोकांची मानसिकता असते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठरवता येईल, त्यामुळे त्यावरती आता विधान करणे फारसे योग्य ठरणार नाही.  तसेच बारामती लोकसभेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल,असा दावाही त्यांनी यावेळी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love