शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे – “लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या ‘प्रजासत्ताक भारत देशात’, शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे, याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे आज काळाची गरज असल्याचे”, मत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले. पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात मंडळांना केलेली मदत त्यांचे दातृत्व दर्शवते असे गौरोद्गार त्यांनी काढले.

फणी आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “शिवरायांची न्यायनिती” या देखाव्याच्या ऊदघाटन भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त ऊद्योजक पुनीतजी बालन यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात तिवारी यांनी वरील मत व्यक्त केले.

ऊद्योगजक घराण्यांनी ‘सामाजिक दायीत्वाची गरज पुर्ण करण्यासाठी, डॅा मनमोहनसिंगांच्या ‘युपीए सरकारने’ देशात प्रथमच ‘सीएसआर’ (कार्पोरेट सोशल रीस्पॅान्सीबीलीटी) हा कायदा आणला व त्यामुळे मोठ्या सामाजिक गरजा पुर्ण करणारे प्रकल्प होऊ शकले, असेही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.

मंडळाचे हे ७६ वे वर्ष असुन, उद्योजक व गणेशभक्त  पुनीतजी बालन यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतांना, मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, सामाजिक व नागरी ऊपक्रम राबवावेत” असे सांगितले. पुनीत बालन यांचा मंडळाचे वतीने अघ्यक्ष ओंकार काळे यांनी शिंदेशाही पगडी व तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

मा नगरसेवक रविंद्र धंगेकर, योगेश समेळ यांचीही यावेळी  भाषणे झाली. या प्रसंगी गणेश नलावडे, प्रा वाल्मिक जगताप, इंटक कामगार नेते राजेंद्र खराडे, नुरूद्गीन ईमानदार, गोपाळ पायगुडे, महेश मोरे, भोईराज समाजाचे पंच  नागेश खडके, जनार्दन पवळे, संघाचे कार्याध्यक्ष राकेश डाखवे, अनिल खराडकर, जगदीश भुतडा त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष ओंकार काळे, खजिनदार किरण हूलावळे सक्रेटरी, आशुतोष मेमाणे, कार्याध्यक्ष योगेश दवे, अल्ताफ चांद मणियार, गणेश परदेशी, ओंकार शितोळे, अभिषेक खराडे, यश अनवेकर, मयुर घोडखिंडी इ उपस्थित होते.

स्वागत-प्रास्ताविक मंडळाचे विश्वस्त-अध्यक्ष व पीएमपीएमएल कामगार संघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे व मंडळाचे अध्यक्ष ओंकार काळे यांनी केले. आभार प्रदर्श महेश मोळावडे यांनी केले.

 “शिवरायांची न्यायनिती” देखावा

फणी आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “शिवरायांची न्यायनिती” या देखाव्याद्वारे शिव-चरीत्रातील प्रसंग ‘अफजल खानाच्या वधा नंतर (वैर हे अफजल खान सोबत होते मुलांसोबत नाही, असे सांगुन त्याचे दोन्ही पुत्रांना’ महाराज सोडून देतात व अफजल खानचे मृत्यु संस्कार त्यांच्या धर्म रीवाजाप्रमाणे करण्याचे व त्याच्या कबरीवर दिवा-बत्ती करण्याचे आदेश देतात. ‘स्वराज्याचा शत्रू तो आपला शत्रू अन्यथा केवळ धर्म ऱ्भावनेने मुस्लिमांशी शत्रुत्व नाही’. हीच शिव छत्रपतींची “तत्वांवर आधारीत कशी न्याय-निती” होती हे दाखविण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *