पिंपरी(प्रतिनिधी)-पिंपरी चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, वृषाली मरळ यांची महासंघाच्या अध्यक्षपदी, तर पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
चौधरी यांच्या निवडीबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पश्चिम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, अशोक चव्हाण, तानाजी मनोकर, चंद्रकांत चोपडे, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात १४८ ज्येष्ठ नागरिक संघ असून, तीस हजार सभासद आहेत. या ज्येष्ठ नागरिक संघाचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महासंघांची २०२३ ची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात प्रगती पॅनेलला घवघवीत यश मिळाले.