Namdev Jadhav, who made controversial statements against Sharad Pawar, got a black face

शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (ncp) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे प्राध्यापक नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांच्या तोंडाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान, प्राध्यापक नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवारांचं असेल असे सांगितले. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता.पण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालयामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नामदेवराव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्याच दरम्यान नामदेवराव जाधव यांना नवी पेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेहर्‍याला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले.

पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

शरद पवार हे ओबीसी असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी एक पत्रक सादर करुन केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुण्यात कार्यकर्ते आक्रमक होत नामदेव जाधवांवर हल्ला केला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काळं फासलं. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. नामदेव जाधव यांच्याविरोधात खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा व्यक्तीने शरद पवारांविरोधात टीका करणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नामदेव जाधव करत असलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *