नाशिकचा बुलेट राजा पुण्यात गजाआड:पाच वर्षांचे कारनामे उघड

क्राईम
Spread the love

पुणे– पिंपर -चिंचवड व पुणे, नाशिक परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद येथे विक्री करणाऱ्या नाशिक शहरात बुलेट राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सराईत वाहन चोराला त्याच्या धुळ्यातील साथीदारासह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 बुलेट आणि अन्य 4 अशा एकूण 17 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 14 महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

हेमंत राजेंद्र भदाने (वय 24, रा. भोरवाडा, सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर त्याच्या एका साथीदाराला (योगेश सुनील भामरे, वय 24, रा. धुळे) देखील पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी येथुन के.टी.एम. मोटार सायकल चोरी केलेला एक चोर भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाचे समोर येणार आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हेमंत पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली करता त्याने 1 सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथुन केटीएम मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफ झेड, के टी एम, पल्सर अशा महागड्या मोटार सायकली चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे या भागातील नागरीकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगुन विकल्याचे समोर आले.

पोलिसांनी धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर मधून 10 बुलेट, 2 एफ झेड, 1 के.टी.एम व 1 पल्सर अशा 17 लाख 70 हजार रुपये किमतीची एकुण 14 दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी, चाकण येथील सहा, पुण्यातील चार आणि नाशिक जिल्ह्यातील दोन असे एकूण 12 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी कोणत्याही वाहनाने शहरात यायचा. पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी हेरून चोरायचा. त्यानंतर ती विकण्यासाठी सोशल मीडियावर वाहन विक्री करण्याची जाहिरात द्यायची. दुचाकी विकल्यानंतर सर्व मेसेज डिलीट करून टाकायचे अशा प्रकारे हा चोरटा वाहनचोरी करत होता. पोलिसांनी या सराईत चोरला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्या एका साथीदाराला (योगेश सुनील भामरे, वय 24, रा. धुळे) देखील पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीचे लॉक तोडायचा आणि वायरिंग जोडून दुचाकी सुरू करून चोरून न्यायचा. 12 ते 15 हजार रुपयांना तो वाहने विकत असे.

दरम्यान, आरोपी भदाने याच्याकडून काही दुचाकी खरेदी करून तसेच काही दुचाकी विक्री करण्यात आरोपी योगेश भामरे याने मदत केली. आणखी काही जणांचा यात समावेश आहे का, याचा शोध सुरू आहे. तसेच अशा दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांकडे देखील विचारणा होणार आहे. इतक्या कमी किमतीत नवी दुचाकी मिळत असतानाही कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित का केली नाही, तसेच दुचाकी चोरीची आहे, असे माहीत असतानाही ती खरेदी केली का, आदी चौकशी अशा ग्राहकांकडून केली जाणार आहे.

नाशिक आणि ठाणे शहरात 37 गुन्हे दाखल आहेत. 2015 सालापासून तो वाहनचोर करत आहे. लॉकडाऊन च्या कालावधीत आरोपीने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. इथून त्याने काही दुचाकी वाहने चोरली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *