Kapil Dev - Mahendra Singh Dhoni, India's World Champion, kept away from the final 'World Cup' is regrettable

दहा महिन्यानंतरही पंतप्रधानांनी दखल न घेणं हा जनतेचा अपमान – गोपाळदादा तिवारी

राजकारण
Spread the love

पुणे – हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतीं शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्राची श्रध्दास्थाने असलेल्या महात्मा फुले – सावित्री बाई फुलेंविषयी अनाकलनीय, अशोभनीय, निंदनीय वक्तव्ये काढणाऱ्या भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी’ मार्च २०२२ मध्येच् मेट्रो ऊदघाटन प्रसंगी तत्कालीन ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली ‘पुणेकरांच्या साक्षीने – विनंती वजा तक्रार’ पुणेकरांच्या स्मरणात आहे. मात्र या तक्रारीची तब्बल १० महीने पंतप्रधानांनी दखल ही न घेणे हा पुणेकरांचा व राज्यातील जनतेचाही एक प्रकारे अपमान व जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज पुणे बंद प्रसंगी दिली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आणि कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे या मागणीसाठी सर्व धर्मीय, सर्व पक्ष  आणि  विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून  मंगळवारी पुणे बंदची हाक दिली होती. या मुक मोर्चात गोपळदादा तिवारी सहभागी झाले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

तिवारी म्हणाले, तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारी नंतरही, राज्यपालांकडुन महाराष्ट्राच्या भुमि पुत्रांचा, उद्योजकाचा, श्रमिकांचा अवमान होत राहीला. राजपालांनी संविधानिक कर्तव्ये ही बजावली नाहीत व राज्यातील न्याय-प्रविष्ट सरकारला पाठीशी घालत राज्यातील महापुरुषांच्या बदनामी कारस्थानात ते व्यग्र राहीले. अखेर पुणे शहरातील शिवप्रेमींना हे पाऊल ऊचलणे भाग पडले. याच कोश्यारींचा निषेध करण्यासाठी व राज्याची अस्मिता जपण्यासाठी शिवप्रेमींनी दिलेल्या बंद मध्ये सहभागी होऊन, बंद १००% यशस्वी करत ‘सुज्ञ पुणेकरांनी सत्ताधिशांना एकप्रकारे समज दिली असल्याचे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *