‘कया यही है अच्छे दिन?’ युवासेनेचा मुंबईत बॅनर लाऊन सवाल


मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा संघटनेने, म्हणजेच युवा सेनेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. युवा सेनेने पश्चिम वांद्रे भागातील अनेक पेट्रोल पंप व रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे युवासेनेने ‘कया यही है अछे दिन?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे.

देशात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतीविरोधात विरोधक आक्रमक झाले आहे. कॉँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इंधनाचे आणि गॅसच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. तेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.  तर विरोधी पक्ष या विषयावरून सरकारला जबाबदार धरत आहेत. मात्र, 14 व्या दिवशीही सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

अधिक वाचा  पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो, आता करता करणार काय? : का म्हणाले असे अजित पवार
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love