लसिकरणाचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होणार : 60 वर्षे आणि अधिक वयोगटाला दिली जाणार लस: सर्वांना मोफत लस नाही


नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील   27 कोटी लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र,हा दुसऱ्या टप्प्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यामध्ये एका गटाला मोफत लस उपलब्ध करून दिली जाईल तर दुसऱ्या गटाला लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहे.

या दोन्ही गटाचे लसीकरण मार्चच्या सुरुवातीला सुरू केले जाणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यामध्ये प्राधान्य दिले जाईल. दरम्यान, लसिकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात लाभार्थींचे नाव ज्या राज्याच्या मतदार यादीत आहे, त्या राज्याशिवाय इतर राज्यातही लस घेता येणार आह. सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने राज्य सरकारचे आता 'कॅरॅव्हॅन' पर्यटन धोरण.. काय आहे हे धोरण?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार सरकारी सूत्रांनी सांगितले की,  लसिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘दोन पूर्व परिभाषित गट असतील. त्यातील कुठल्या गटाला मोफत लस मिळेल हे सरकार ठरवेल. लसिकरणासाठी  नोंदणी करताना लाभार्थ्यांना ते निशुल्क लसीकरणासाठी पात्र आहेत की नाही याची माहिती होईल.

“ही लस कोणाला विनामूल्य मिळणार आणि कोणाला स्वत: विकत घ्यावी लागेल, याबाबत अंतिम माहिती लवकरच जाहीर केली जाईल,” असेही सूत्रांनी सांगितले. लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला. यामध्ये आरोग्य आणि प्राथमिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करीत आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्राधान्य गट हा 50 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल. या गटात 60  वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयांना प्राधान्य दिले जाईल त्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल. सूत्रांनी सांगितले की, पुढील टप्प्यात लाभार्थ्यांनी स्वत: ची नोंदणी करताना दिलेली माहिती मतदार यादी व आधारमध्ये दिलेल्या आधारे तपासली जाईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love