पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

राजकारण
Spread the love

पुणे- ” मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार” असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांसह कामगार नेते सुनील शिंदे,पर्वती काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार,मार्केटयार्ड काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,भारत सुराणा, दीपक ओव्हाळ,प्रकाश आरने,संतोष पाटोळे, मामा परदेशी, गोरख मरळ, रवी ननावरे, सतीश कांबळे,शाम काळे, सुजित लाजूरकर,सीमा महाडिक,मीनाक्षी मखामले  व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यासंदर्भात आबा बागुलांनी सांगितले की , पेट्रोल डिझेलची दरवाढ ही प्रत्येकाला चटके देत आहे. कोरोना काळात नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले व्यवसाय बंद पडले अश्या अवस्थेतही मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोज चालू ठेवली आहे. त्यामुळे एकार्थे जनतेवरती मोदी सरकार करत असलेला अत्याचारच  आहे. संकट काळात जनतेला दिलासा देण्याच्या ऐवजी दरवाढ करून ते जनतेला अधिक अडचणीत व दुःखात ढकलत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फुल देऊन आम्ही तीव्र आंदोलन केले.

भापकर पेट्रोल पंम्प येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकांना गुलाबाचे फुल हाती देऊन कृपया मोदी सरकार पेट्रोल डिझेल दरवाढ करून करत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात व्हाट्सअप, फेसबुक यांसारख्या सोशिअल मीडियावर मेसेज पाठवून निषेध करण्याचे आवाहनही नागरिकांना केले त्याला नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आम्ही पण यामध्ये सहभागी असून आम्हांलाही पेट्रोल डिझेल दरवाढीचे रोज चटके बसत आहेत. आम्ही सोशिअल मीडियावर नक्की याचा निषेध करणार असे त्यांनी सांगितले. आंदोलनात असलेल्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पळून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. पेट्रोल दरवाढी विरोधात नागरिकांनी मात्र अतिशय संतप्त प्रतिकिया व्यक्त केल्या असून राज्यकर्ते केंद्र सरकार, भाजपचे कार्यकर्ते आता मूग गिळून गप्प का घरी बसलेत असा प्रश्न देखील संतापाने अनेकांनी विचारला. शेवटी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन हा कार्यक्रम संपला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *