प्रभावशाली संघटक – दत्तोपंत ठेंगडी

Influential organizer - Dattopant Thengadi
Influential organizer - Dattopant Thengadi

दत्तात्रय बापूराव उर्फ दत्तोपंत ठेंगडीजी, उत्तुंग बुद्धिमत्ता, प्रभावशाली संघटक, तत्वज्ञानी, वाचनाची आवड असणारे, थोर विचारवंत, उत्कृष्ट संवादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे जिवंत उदाहरण, यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० ला महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला. १५ व्या वर्षी ते ‘वानर सेनेचे’ तसेच महानगरपालिका शाळा आर्वीच्या विद्यार्थी संघटनेचे सुध्दा अध्यक्ष बनले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता आणि १९३६-३८ मध्ये ते हिन्दुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे (HSRA)  सदस्य पण होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ३५ देशांचा प्रवास केला. श्री माधवराव सदाशिवराव गोळवलकर म्हणजेच गुरूजी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या वर होता. ठेंगडीजी प्रचारक म्हणून १९४२ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून संपूर्ण भारतभरात व नंतर व्यापारी संघाच्या चळवळीचे नेते म्हणून जगभरात त्यांनी प्रवास केला. त्यांनी आरएसएसचे प्रचारक म्हणून केरळमध्ये १९४२ ते ४४, बंगालमध्ये १९४५ ते ४७ आणि आसाम १९४८ ते ४९ कार्य केले.

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

त्यांनी नेहमी सर्वसमावेशकतेवर विश्वास ठेवला होता तर, राजकारणातील अस्पृश्यतेचे खंडण करत असत. त्यांनी अनेक संस्थांना प्रगतीपथावर नेले, हे करत असताना हिंदू धर्माचे मूळ तत्त्वज्ञान व भारतीयता त्यांच्यात काळजीपूर्वक रुजवली. त्यांचा दृष्टिकोन पक्का होता की, राष्ट्र भावनेचा तेंव्हाच कायाकल्प होईल जेंव्हा लोकांचा भारताच्या परंपारीक ज्ञानावर विश्वास दृढ होईल.

श्रेणी संघर्षाऐवजी सहकार्याच्या तत्वांवर कामगारांची मोठी चळवळ उभी करणारे ठेंगडीजीच होते. १९५० या वर्षी जवळपास एक तृतीयांश जग साम्यवादी विचाराधारेत आकंठ बुडाला होता. भारतात एक नविन घोषणा केली जावू लागली – लाल किले पे लाल निशान, माँग रहा हैं हिन्दुस्तान. त्या काळात भारतात श्रमिकांच्या चळवळीवर डावी विचारप्रणाली प्रभुत्व गाजवत होती. त्या वेळी दत्तोपंत ठेंगडीजी यांनी कामगार व शेतक-यांच्या चळवळीला मार्ग दाखवला व १९५५ मध्ये भारतीय मजदूर संघ स्थापला (BMS). आज बीएमएस जगभरातील एक अग्रगण्य कामगार संस्था आहे, आणि देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना म्हणून करते. भारतातील श्रमिक व शेतकरी यांच्या चळवळीतील योगदानासाठी सौराष्ट्र विद्यापीठ, गुजरात कडून त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आले होते.

अधिक वाचा  कोणी कोणाचे ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे- शरद पवार

बेंगलुरू शहरात दिलेल्या एका व्याख्यानात, त्यांनी ठामपणे सांगितले की, आपण पाश्चात्यांचे अंध:पणाने अनुकरण करायला नको. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, पाश्चिमात्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण नाही. “आम्हाला नाही वाटत की आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण,मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीच्या, एक शतकाहून अधिक काळाच्या प्रभावाने बहुतांश भारतीयांच्या मेंदूला ह्या ठाम मताची सवय बनली आहे  की, प्रत्येक पाश्चिमात्य गोष्ट म्हणजे चांगलीच. आपले आधुनिक आचार व विचार पाश्चिमात्यच असले पाहिजेत. कितीही झाले तरी ही एक मानसिक नाकेबंदीच आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण यातून बाहेर आलेच पाहिजे, आणि पाश्चिमात्य पूर्वग्रहांशिवाय आपण विचार करायला शिकले पाहिजे. आपण हे स्वीकारलेच पाहिजे की, आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नाही आणि पाश्चिमात्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण नाही.

अधिक वाचा  पूजा वनदुर्गांची : धैर्यशील हमसाय

वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत लहानगे दत्तोपंत बोलू शकत नव्हते, तेंव्हा चिंतित आईवडिलांनी त्यांना गाणगापुरीला दत्त महाराजांच्या अनुग्रहासाठी घेवून गेले, आणि तद्नंतर त्यांना वाचा फुटली. तेंव्हा पासून वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत ते स्पष्टपणे व्यक्त होत राहिले आणि त्यांना सगळे ऐकत असत.

            बडे शोक से सुन राहा था, जमाना

            तुम हो सो गये दास्तान कहते कहते

या ओळींनुसार १४ ऑक्टोबर २००४ ला ह्या महान वक्त्याने संपूर्ण देशाला नि:शब्द केले. जीव जन्माला येतो, जगतो आणि मृत्यू पावतो, पण काही विशिष्ठ महापुरुष ईश्वरी इच्छेनुसार जन्म घेतात आणि ईश्वरी योजनेचे कार्य सिद्ध करून देवलोकी प्रयाण करतात.

…….शिल्पा निंबाळकर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love