Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

भाजपचे बायकी राजकारण :‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीलाच का केले नाही..? — गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- ‘मॅाडेलींग अभिनेत्र्या’ कंगना राणावत व नवनित राणा यांनाच् काही कारणाने पुढे करून मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे व ‘मविआ सरकार’ला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे पोरकट व ऊथळ बायकी राजकारण निंदनीय असल्याची टीका करत काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी त्याचा निषेध केला..

देवेंद्र फडणवीसांच्या ‘पत्रकार परीषदे’मुळे अखेर हनुमान चालीसा’चे मुख्य प्रवर्तक भाजप असल्याचेच सिध्द झाले. तथाकथित ‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीलाच का केले नाही..? असा सवालही गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

श्री हनुमान चालीसा’चा मतिथार्त समजून न घेता, तथाकथित हिंदूत्वाच्या राजकारणाची चुल पेटवणाऱे सामाजात फक्त दुही माजवण्याचाच प्रयत्न करत नाहीत तर ‘प्रभू हनुमान चालीसाचे’ महत्व, पावित्र्य व गांभीर्य देखील कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.  

महीलांना पुढे करून हनुमान चालीसा रस्त्यावर म्हणायला लावण्याचा इव्हेंट हा ‘ताटे व थाळ्या वाजवण्याजोगा’ आहे काय..(?) असा संतप्त सवाल विचारून काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी हा प्रकार आपल्या सहीत असंख्य हनुमान भक्तांना वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. याऐवजी जनतेस भेडसावणाऱ्या वाढत्या महागाई व बेरोजगारी विषयी आंदोलन पेटवले असते व प्रभू श्री हनुमान मंदीरांमध्ये साकडे घालत जर हनुमान चालीसा म्हंटला असता तर ती समजू शकलो असतो व हनुमान चालीसा म्हणण्याची ती योग्य व पवित्र पध्दत ठरली असती,असेही गोपाळदादा तिवारी यांनी नमूद केले.

‘राज्याला कर्जबाजारी’ करून सत्ता बनवू शकत नसल्याचे राज्यपालांना लेखी कळवून, पळ काढणाऱ्यांची आता मात्र सत्तेशिवाय चडफड होत असुन फडणवीसादी मंडळींचे भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागू नयेत म्हणून देखील मविआ सरकार अस्थिर करण्याचे कुटील कारस्थान व थयथयाट चालला आहे, अशी पुस्तीही गोपाळदादा तिवारी यांनी पुढे जोडली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *