जम्मू, 14 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी संघ स्वयंसेवकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी, सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि भारतातील पारंपारिक कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
तीन दिवसांच्या जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ मोहन भागवत यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले.संघ परिवारातील 38 संघटनांचे 105 स्वयंसेवक या बैठकीला उपस्थित होते ज्यात विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा यासाठी संघटनेचा अधिक विस्तार करण्यावर सरसंघचालकांनी भर दिला. त्यांनी विशेषतः आरएसएसच्या स्थापनेच्या शताब्दी समारंभाच्या (100 व्या वर्षाच्या) आधी संस्थेचा कार्यविस्तार करण्यावर भर दिला.
या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी जम्मू व काश्मीर रा. स्व. संघाच्या वतीने खेडी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. ग्रामविकास आणि समाजात सामाजिक समरसता निर्माण करणारे प्रकल्प हाती घेतलेल्या स्वयंसेवकांना त्यांनी काही सूचना केल्या.
या व्यग्र वेळापत्रकात सरसंघचालकांनी केशव भवन येथे सेवा भारतीच्या वसतिगृहात राहणाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सरसंघचालकांसमोर देशभक्तीपर गीते गायली.
क्षेत्र संघचालक सीतारामजी व्यास आणि जम्मू-काश्मीर प्रांताचे संघचालक डॉ. गौतम मेंगी हेही मंचावर उपस्थित होते.
ReplyForward |