जंबो रुग्णालयातील डॉक्टरांचे पगारासाठी आंदोलन


पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले जंबो हॉस्पिटल सुरुवातीपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.हॉस्पिटल सुरू करण्यात आले तेव्हा येथील ढिसाळ व्यवस्थेमुळे मोठा गोंधळ आणि वाद निर्माण झाला होता. आता येथे सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी आपले थकलेले वेतन मिळावे यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही आंदोलन मागे घेण्यात आले.

हे हॉस्पिटल सुरू झाले त्यावेळी त्याचे व्यवस्थाप  ‘लाईफ लाइन’ या एजन्सीकडे होते. सुरुवातीला गलथान कारभारामुळे उडालेल्या गोंधळामुळे त्यांच्याकडून हे काम काढून घेण्यात आले. मात्र, त्यावेळचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अजूनही काम करत आहेत. ‘लाईफ लाइन’ ने या डॉक्टरांना वेतन दिलेले नाही त्यामुळे ते वेतन आणि या महिन्यातील वेतन मिळावे यासाठी ही आंदोलन करण्यात आले.

अधिक वाचा  # आता मागे नाही राहायचे : कोण होणार करोडपतीमध्ये आता 2 कोटी जिंकण्याची संधी

लाईफलाईनचे काम काढून घेण्यात आल्यानंतर  महापालिकेकडे येथील व्यवस्थापनाची सूत्रे देण्यात आली. महापालिकेने येथील व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेडीब्रोस या एजन्सीला पीएमआरडीएकडून जम्बो रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचे काम काम देण्यात आले. ९ सप्टेंबरपासून याठिकाणी मेडीब्रोसचे काम सुरू झाले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love