पुणे–भारत सरकारने संसदेमध्ये तीन लेबर कोड पारीत केले आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदलांचा, सूचनांचा कोणताही विचार नवीन लेबर कोड मध्ये केलेला नाही. पारित केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुण्यातील लेबर ऑफिससमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
नवीन लेबर कोड मध्ये कायम स्वरूपाचे रोजगार कमी होणार आहे. कामावरून कमी करणे, कामगार कपात ले ऑफ, क्लोजरसाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक होते परंतु नवीन लेबर कोड मध्ये 300 पेक्षा जास्त कामगार संख्याची मर्यादा आणल्या मुळे असाच बदल मॉडेल स्टँडिंग ऑडर मध्ये आणला आहे त्यामुळे व्यवस्थापनाला कामगारांना कमी करणे, ले ऑफ, क्लोजर करणे सोपे झालं आहे. शोषण व अन्याय विरूध्द सनदशीर संपाच्या बाबतीतही मोठे बदल केल्या मुळे कामगारांमध्ये सरकार विरोधात त्रिव नाराजी व असंतोष निर्माण झालेला आहे.
लाखो कामगार 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या आस्थापनेतील काम करतात, त्यामुळे मालकाला मनमानी पध्दतीने कामावर ठेवणं, कमी करणे सोपे झाले आहे. नोकरी च्या अनिश्चितता, अस्थिरता निर्माण झाली आहे. नोकरी गेलेल्या कामगारांना हालअपेष्टाना सामोरे जावे लागेल असे भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.
संसदेमध्ये दुसरा श्रम आयोग आणल्याचे नमूद केले आहे पण श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे, कामाची, कामगारांची परिस्थिती सुरक्षित करणं, सामाजिक सुरक्षा मुलभुत अधिकारात समाविष्ट करणे इत्यादी शिफारशिंचा नवीन लेबर कोड मध्ये समावेश केला नाही असे भारतीय मजदूर संघाचे मत आहे.
तांत्रिक बाबीमुळे सामाजिक सुरक्षा तळागाळातील कामगारांना मिळु शकत नाही. ऑक्युपेशनल हेल्थ अॅङ सेफ्टी कोड लाभ सामान्य कामगारास मिळु शकत नाही. अंमलबजावणीची यंत्रणा नवीन लेबर कोड मध्ये परीक्षणाअभावी कमकुवत आहे. म्हणून भारतीय परिस्थितीत कामगार हित जोपासण्या करिता कामगार विरोधी तरतुदी रद्द करण्याची मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा वतीने मागणी यावेळी करण्यात आली. या बाबतीत राष्ट्रपती, केंद्रीय कामगार मंत्री आणि कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांना देण्यात आले आहे .
या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष मा श्री हरी सोवनी, चिटणीस जालिंदर कांबळे, अभय वर्तक, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उमेश विस्वाद, सचिन मेंगाळे, निलेश खरात, बाळासाहेब पाटील, अण्णा महाजन, सचिन भुजबळ यांनी आंदोलन वेळी मनोगत व्यक्त केले.