पुण्यातील जंबो हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेली महिला सापडली


पुणे—पुण्यातून जम्बो कोविड हॉस्पिटलमधून  बेपत्ता झालेली 33 वर्षीय रूग्ण महिला अखेर सापडली आहे. पिरंगुट भागात तिच्या नातेवाईकांना ती आढळून संबंधित आली आहे. महिलेला खरंतर 5  तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली आणि तिकडेच बेवारस राहत होत पण ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात देताच माध्यमातूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि एकच खळबळ उडाली होती.

आज अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला आहे.  पण या घटनेमुळे जम्बो हॉस्पिटलची नाहक बदनामी झाल्याची खंत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  तर जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण  बेपत्ता झाला होता,असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केली. दरम्यान, या घटनेत नेमकं चुकलंय, याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करताहेत

अधिक वाचा  बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, प्रिया गायकवाड ही महिला २९ तारखेला शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यानंतर त्या महिलेच्या आईने १३ सप्टेंबर रोजी आमच्याकडे तक्रार केली की, कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी उपचार घेत होती. मात्र आजअखेर ती सापडत नाही आणि मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यांची तक्रार दाखल करून, संबधित महिलेचे फोटो शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले. त्यानंतर आमच्या बातमीदाराच्या मार्फत पिरूगुट येथे एक महिला नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, संबधित महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love