भल्या पहाटे अजित दादांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे-मुंबई
Spread the love

Ajit Dada inspects the work of Metro early morning

पुणे- उपमुखयमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोच्या कामाची गुरुवारी भल्या पहाटे पाहणी केली. अजित दादांची मेट्रोच्या कामाची पहाटे पाहणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसे पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालत आहे.

 मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी यावेळी अजित पवार यांना प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. सध्या कोविड परिस्थितीचा परिणाम मेट्रो च्या कामावर झाला आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा परिस्थितीत मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसे पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालताहेत.

 गेल्या आठवड्यातही त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी अशीच पहाटे केली होती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवडी या 2 मार्गांचे काम महमेट्रो कडून सुरू आहे. त्यातील पिंपरी चिंचवड मधील मार्गावर मेट्रोची ट्रायल देखील झाली आहे.  अजित पवार यानी गेल्या शुक्रवारी तिकीट काढून मेट्रोत बसण्याचा देखील अनुभव घेतला.

पुण्यातील मेट्रोच्या कामात अजून पाहिजे तितकी प्रगती नाही.  असं असताना मेट्रोच्या अडचणी दूर करण्यासाठी अजित पवार लक्ष घालताहेत, त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजा बहादूर मिल समोर उभ्या राहत असलेल्या मेट्रो स्टेशन ची पाहणी करून आढावा घेतला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *