gtag('js', new Date());
  • Home
  • राजकारण
  • राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

Spread the love

मुंबई– राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी पत्रात जी भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचे पवारांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांनी हे पत्र ट्वीट केले आहे.

पवार यांनी राज्यपालांचे पत्र राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.

अधिक वाचा  खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा यांच्या अनुपस्थितीबाबत काय म्हणाले शरद पवार?

“राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the love सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

Spread the love

Spread the love पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 14, 2026

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

by News24Pune time to read: <1 min
0