पुणे–सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे 90 टक्के निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असून गुरुवारी सर्व शंभर टक्के निकाल जाहीर केले जातील असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या आणि हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असेही कुलगुरूंनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या यामध्ये काही अडचणी देखील आल्या मात्र यासर्वावर मात करत विद्यापीठाने ही प्रक्रिया पूर्ण करत नियोजित वेळेत 90 टक्के निकाल देखील जाहीर केले असे कुलगुरू डॉ करमाळकर यांनी सांगितले.तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या आणि हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, डिसेंम्बर मध्ये होणाऱ्या बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांसोबत या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ प्रयत्न करेल असे कुलगुरूंनी सांगितले.
तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी, पुन्हा परिक्षेची मागणी करत होते मात्र पुणे विद्यापीठाने पुन्हा फेर परीक्षा घेण्यास नकार दिला होता त्यामुळे
तीनशे पेक्षा ज्यास्त विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार की काय अशी भीती होती, यावर आता विद्यापीठाने पीडित विद्यार्थ्यांना पुन्हा फेर परीक्षा देता येणार मात्र तांत्रीक तृटींच्या आडून विद्यापीठाची दिशाभूल करणाऱ्या परीक्षांर्थींवरही कारवाई होणार असल्याचे परीक्षा विभाग नियंत्रक महेश काकडे यांनी स्पष्ट केले..