gtag('js', new Date());
पुणे-- पदवीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने  शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारला या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदाचा...
मुंबई-महाराष्ट्रामध्ये जिओच नाणं पुन्हा एकदा खणखणीत असल्याचे ट्राय च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या  आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. जून 2020 या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहिमध्ये ग्रॉस रेवेंन्यू मध्ये जिओ ने बाजी मारली असून अव्वल स्थानी असलेल्या व्होडाफोन आयडिया या दिग्गज आणि जुन्या टेलिकॉम ऑपरेटर चे वर्चस्व मोडीत काढून तब्बल रु.1521कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या आयडीया...
पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. असे असताना राज्यातील काही भागात अजूनही मास्कचा वापर केला जात नाही. पुणे-पिंपरीचिंचवड आणि पुणे जिल्ह्यात मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र येणार याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय मतांमध्ये भिन्नता असली तरी अशा संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोपाची ही वेळ नव्हे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई- कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मात्र, परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावरून राज्यात राजकारणही पेटले आणि आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. परीक्षा घ्याव्यात आणि नाही घ्याव्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या. त्यावर...
मुंबई-अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन संदर्भ समोर येत आहेत.  या रहस्यमय सदर्भामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. काल या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ आल्यानंतर आता त्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत.  या प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की रिया चक्रवर्ती ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत होती तिचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे.