डीएसकेंच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत- मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात कुटुंबासह अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना  त्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च नायायालयात दाखल करण्यात आली आहे. या  प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

गुंतवणूकदारांची जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना त्याच्या कुटुंबियासह अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या अनेक  महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. हे प्रकरण निकाली निघावे अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून केली जात आहे.

अ‍ॅड. बीडकर यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यातील न्यायालयात खटला लवकर निकाली निघावा याबाबत याचिका दाखल केली होती. मात्र,त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे बीडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  

या प्रकरणातील गुंतवणूकदारांचे १ हजार १५३ कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे तसेच हे प्रकरण तातडीने निकाली काढावे, डीएसके यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट म्हाडाला देऊन येणा-या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. सरकारने जप्त केलेल्या डीएसके यांच्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने त्याचा लिलाव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा. असेही याचिकेत नमुद करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *