काश्मीरच्या चिनाब नदीवर बांधला जात आहे आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीचा रेल्वे पूल

राष्ट्रीय
Spread the love

भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना

जम्मू-काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्ग सौंदर्याने नटलेला भारताचा अविभाज्य भाग. परंतु शत्रू राष्ट्रांच्या कारवायांनी या भागाची ओळख अशांत भाग म्हणूनच जास्त झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेची नाळ जोपर्यंत भारताच्या इतर भागाशी जोडली जात नाही तोपर्यंत या भागात विकास आणि शांतता प्रस्थापित होणे अवघड आहे. असे असताना जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवर आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीचा रेलेवे पूल उभारला जात आहे. यामुळे काश्मीर खोरे देशाच्या उर्वरित भागाला जोडले जाणार आहे.

रिआसी जिल्ह्यातील बक्कल ते कौडी दरम्यान चिनाब नदीवर बांधलेला १३१५ मीटर लांबीचा आणि ३५९ मीटर उंचीचा देशातील सर्वात लांब कमानीच्या आकाराचा हा रेल्वे पूल भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डीआरडीओच्या सहाय्याने या पुलाचे सुरक्षा ब्लू प्रिंटही तयार केले गेले आहे.

या पुलाच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठल्या गोष्टी करण्यात आल्या आहेत, याबाबत अधिकारी जास्त उघडपणे बोलत नाहीत. परंतु, आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि ‘स्फोट प्रूफ’ स्टीलने बनवलेल्या रेल्वे पुलाला दहशतवादी नुकसान करु शकणार नाहीत. दहशदवाद्यांकडे अगदी 40-50 किलो स्फोटके असले तरी ते पुलाचे नुकसान करू शकणार नाहीत असे ते सांगतात.

सुरुवातीपासूनच पुलाच्या सुरक्षिततेविषयी खूप जागरुकता पाळली जात आहे. येथील अधिकारी सांगतात  दहशतवादी घटना घडण्यासाठी कुठलीही वेळ सांगून येत नाही.  काही मानवी चुकांमुळे असे समजा घडले  की दहशतवादी  या पुलाजवळ आले तरी घाबरण्याचे कारण नाही. एकतर एवढ्या मोठ्या प्रमाणात 40-50 किलो स्फोटके ते येथे आणू शकणार नाहीत आणि जरी  आणले तरी पुलाला काहीच होणार  नाही. थोडेफार नुकसान होण्याची संभावन असू शकते, झालेच तर काही थर खराब होऊ शकतात, परंतु यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार नाही. कमी वेगाने रेल्वे पुलावरून जाऊ शकते.

दहशदवाद्यांनी  पन्नास किलोग्राम पर्यंत टीएनटी,  पुलाच्या वरच्या भागात किंवा खालच्या स्तंभाच्या सभोवताली लावले तरी काहीही करू शकत नाही. पुलाच्या 16 खांबांच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था केली जाते आहे.  अशाप्रकारचे पाच स्टीलचे खांब असतील. आता प्रत्येक खांबाला स्वत: चे गेट असावे असा विचार केला जात आहे.

सर्व बाजूंनी जोरदार कुंपण बांधले जाईल. कॉंक्रीटची ठोस रचनाही केली जाणार आहे.  हा पूल भूकंपांसारख्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करेल.

हा भाग भूकंपाच्या बाबतीत भूकंप-झोन -4 मध्ये येतो. भूकंप-झोन -5 नुसार आम्ही पुलाची रचना केली आहे. सात-आठ रिश्टर स्केलवर भूकंप झाला तरी हा पूल सुरक्षित राहील. विशेष बाब म्हणजे हा पूल 265 किमी प्रतितास वेगाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी मुकाबला करू शकतो.  पुलामध्ये असे तंत्रज्ञान स्थापित केले गेले आहे की कोणताही धोका असल्यास चेतावणी गजर आपोआप वाजू शकेल.

पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 29 हजार मेट्रिक टन पोलाद वापरण्यात येणार आहे.  345 कि.मी. लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोडणी प्रकल्पात अनेक बोगदेही असणार आहेत. कटरा  ते धरम पर्यंत 100 किमी लांबीच्या मार्गापैकी 52 किलोमीटर रेल्वे मार्ग कोकण रेल्वेकडून बनविला जात आहे.

यापैकी 46.1% (सुमारे 86%) मार्ग बोगद्यातून जाईल. या मार्गावर एकूण 17 बोगदे आहेत. सर्वात लांब बोगदा 9.3 किमी आहे. या पुलाचे बांधकाम पुढील वर्षापर्यंत पूर्ण केले जाईल. हा पूल पूर्ण झाल्यानंतर 2022 पर्यंत काश्मीर खोरे संपूर्ण भारताशी जोडले जाईल. या पुलाचे सेन्ट्रल स्पॅन 467 मीटर असून त्याची उंची नदीच्या तळापासून ९३५ मीटर आहे. कुतुब मीनारची उंची 72 मीटर आणि पॅरिसमधील आयफेल टॉवर 324 मीटर उंच आहे. यावरून आपल्याला या रेल्वे पुलाच्या उंचीचा अंदाज येईल.

यापूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर-कटरा (25 किमी), बनिहाल-काझीगुंड (18 किमी) आणि काझीगुंड-बारामुल्ला विभाग (118 किमी) आधीच उघडण्यात आला आहे. सध्या शेवटचा कटरा-बनिहाल विभाग (१११ किमी) प्रगतीपथावर आहे. हा विभाग डिसेंबर 2022 पर्यंत उघडला जाईल. या विभागातील 174 कि.मी. बोगद्यापैकी 126 कि.मी. काम पूर्ण झाले आहे.

 नोव्हेंबर 2015 मध्ये पंतप्रधान विकास पॅकेज (पीएमडीपी) अंतर्गत विविध प्रकल्पांसाठी ८०,०६८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. पैसे आल्यानंतर या प्रकल्पाच्या कामातही लक्षणीय वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पायाभूत सुविधा व इतर विकासकामांसाठी हे पॅकेज देण्यात आले होते. या विकास पॅकेजद्वारे बरीच महत्त्वाची कामे केली जात आहेत.

केंद्रशासित प्रदेश झाल्यावर कामाचा वेग वाढला

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर पीएमडीपी अंतर्गत फक्त 54 प्रकल्प शिल्लक राहिले आणि एकूण 58627 कोटी रुपये त्याच्यासाठी आले आणि  इतर नऊ प्रकल्पांसाठी 21441  कोटी केंद्रशासित प्रदेश लडाखला गेले. गेल्या एक वर्षात  कामाने वेग घेतला आहे. जून २०१८  मध्ये, विविध प्रकल्पांवरील खर्च प्रस्तावित खर्चाच्या फक्त 27% होता, आता तो वाढून 54 टक्के झाला आहे. गेल्या दोन वर्षात पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या सात वरून १७ वर पोहोचली आहे.

हा रेल्वे पूल तयार झाल्यानंतर चीनमधील बेईपैन नदीवरील शुईबाई रेल्वे पुलाचे रेकॉर्ड मोडेल.  चीनमध्ये बांधलेला हा रेल्वे पूल एकूण 275 मीटर उंच आहे. चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या या पुलाची उंची नदीच्या तळापासून 359 मीटर आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *