gtag('js', new Date());
मुंबई- जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे.  अमेरिकी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक 1.75 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स रिटेलने केली  आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे 4.21 लाख कोटी रुपये आहे.जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड...
पुणे--पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  या प्रादुर्भाव वाढीसाठी नागरिकांची बेशिस्तही कारणीभूत ठरत आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुण्यात आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील व्यवस्थेचे आणि गलथान कारभार बिंग बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश...
पुणे --कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहाजवळ सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या कैद्यांनी पलायन केल्याची घटना मध्यरात्री घडली. यापूर्वीही तात्पुरत्या सुरु असलेल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  येरवडा कारागृहातील बिल्डिंग क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. आज...
पुणे-विडी सारख्या व्यसनाच्या वस्तूला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव नको, हे नाव हटवा अशी मागणी विविध स्तरातून होत होती. तर या  मुद्य्यावरून आंदोलने, उपोषणे सुरू झाल्याने वातावरण तापले आहे. त्यामुळे अखेर साबळे वाघिरे आणि कंपनीने ते उत्पादित करीत असलेल्या संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.                      ...
पुणे— छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर विडीसारख्या व्यसनाच्या पदार्थांना देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित विडी उद्योगाने संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर त्वरित थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. विडी हा व्यसनाचा पदार्थ आहे. त्यामुळे त्याला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढून टाका  या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संघनेतील काही...
पुणे- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे, ही दुर्दैवी बाब आहे. मराठा  आरक्षणासाठी राज्य सरकारने न्यायालयात केलेले प्रयत्न अपुरे पडले आहेत. राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी  अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. राज्य सरकारने प्रयत्न न केल्यास आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली...