यंदाचा जनसेवा पुरस्कार‘अस्तित्व प्रतिष्ठान’ला जाहीर


पुणे-पुण्यातील जनसेवा बँकेच्या वतीने दिला जाणारा जनसेवा पुरस्कार यंदा पुरंदर तालुक्यातील वीर येथील स्थलांतरित आणि वंचित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणार्‍या ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ या संस्थेला जाहीर झाला आहे. जनसेवा सहकारी बँक लि.चे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

रुपये 1 लाख 1 हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. जनसेवा सहकारी बँक लि.हडपसर,पुणे च्या 48 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार सोहळा रविवार दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 8 वाजता फेसुबक लाईव्ह व युट्युब द्वारे संपन्न होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ उपस्थित असणार आहेत. याचबरोबर या कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती असणार आहे,अशी माहिती जनसेवा सहकारी बँक लि.चे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप,संचालक राजेंद्र वालेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम नाईक यांनी  दिली.

अधिक वाचा  सर्वसमावेश पर्यटन धोरण आवश्यक – आदित्य ठाकरे

पहिला पुरस्कार 1998 साली दादा किराड, प्रभाकर भट यांना देण्यात आला. आज पर्यंत 18 जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 2019 चा जनसेवा पुरस्कार गरजू,आर्थिक,दुर्बल रूग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणार्‍या नाना पालकर स्मृती समिती या संस्थेस देण्यात आला होता. तर 2018 साली सेवावर्धिनी संस्था,2017 साली सक्षम व 2016 साली समराळा गाव यांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love