पुणे-राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (दि.१२) जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल २०.८३ टक्के लागला आहे. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित ३१ हजार ४२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १६ फेब्रुवारी रोजी...
पुणे- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे पदवीधर मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला आहे तर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे भैय्या माने यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ही बंडखोरी राहणार की बंडखोर माघार घेणार हे स्पष्ट होईल.
राजकारण
हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील-जयंत पाटील
News24Pune -
पुणे -महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीही हे सरकार पूर्ण करेल. मात्र, हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे लगावला.भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी...
पुणे-मुंबई
रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू
News24Pune -
पुणे- रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडलेल्या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली. सप्तशृंगी पोलिसांनी या प्रकरणी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.देवाशीष विद्यानंद सक्सेना (वय 26) आणि तेजस त्रिदेव शर्मा (वय 24) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आठ नोव्हेंबर रात्री...
शिक्षण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शंभर टक्के निकाल जाहीर करणार -कुलगुरू
News24Pune -
पुणे--सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे 90 टक्के निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले असून गुरुवारी सर्व शंभर टक्के निकाल जाहीर केले जातील असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या आणि हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असेही...
आरोग्य
सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची नोंदणी पूर्ण
News24Pune -
पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल असला तरी अजूनही दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे सारया जगाचे लक्ष लागले आहे. याबाबत दररोज काही न काही बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. परंतु, आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) भारत यांनी आणखी एक टप्पा पूर्ण...














