gtag('js', new Date());
पुणे—कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड'  लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील हडपसर भागातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याने खळबळ उडाली आहे.'कोविशिल्ड' या लसीचे उत्पादन या कंपनीमध्ये सुरू असून येथूनच देशाच्या विविध भागात लसीचे वितरण सुरू आहे. अशा परिस्थितीत ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली...
पुणे --आर्क्युतर्फे आयोजित फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणे येथील एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोव्हिड-१९ महामारीच्या पश्चात कार्यालयात होणारे बदल आणि कार्यालये अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत स्पर्धकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...
पुणे-- चांगली मैत्रीण असलेल्या तरुणीकडे तरुणाने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, हे तरुणीला न आवडल्याने त्या तरुणीने नकार देऊन भेटणे कमी केले. याचा राग मनात धरून या तरुणाने चक्क ही तरुणी काम करीत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन पिस्तूलचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. मात्र, चिंचवड पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. ही...
पुणे--पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ यावर्षी येत्या ४ ते ११ मार्च, २०२१ दरम्यान होणार आहे. महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष असून चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून यावर्षी महोत्सव सिनेरसिकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी...
पुणे— नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे  फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले. या 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.“मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करु शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास...
पुणे —पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चेने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी...