gtag('js', new Date());
पुणे -देशाची आणि राज्याची निर्मितीप्रक्रिया ही आंदोलनातूनच झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग ही एकप्रकारची शिवीच असून, तो या निर्मितीप्रक्रियेचा तसेच देश व राज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अवमानच असल्याची टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली.डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’...
पुणे-पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे.  सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील एबीआयएल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी  आलेले सुरक्षा रक्क दिसुन येत आहेत.  फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती.
मुंबई- व्यवसाय विस्तारासाठी गाठीभेटी होणे गरजेचे आहे असा सगळ्यांचा सर्वसाधारण समज होता, पण कोव्हिड१९ पश्चात आता ही मानसिकता बदलली आहे. तुमच्या लहान-मोठ्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण अॅब्लिफ्री बिझनेस नेटवर्कने ही संधी तुम्हाला अगदी सहजरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे स्थानिक ते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसाय विस्तार करणे आता...
दिल्ली(ऑनलाइन टीम)-आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या चार सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचाही समावेश होता.आझाद यांना निरोप देताना अनेकदा देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत  भावनिक  झाले. त्यांना अक्षरक्ष: गहिवारून आले आणि सभागृहात काही काळ शांतता पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम...
पुणे(प्रतिनिधि)-राज्य शासनाच्यावतीने कोवीड -19 ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदेश दिलेले...
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम हे स्थगित किंवा रद्द करण्यात आले. परंतु सुमारे एक तपाहून अधिक काळ पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा 'वसंतोत्सव' यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे.'Vasantotsav' will be held this year without any break डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सवा’चे हे सलग १४ वे वर्ष...