gtag('js', new Date());
पुणे- राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण  वाढला आहे. तर दुसरीकडे लसिकरणाच्या मोहिमेला लसीच्या तुटवड्यामुळे खीळ बसल्याची परिस्थिति पुणे जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांची उनिदुनि काढत आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. “कोरोनाची साखळी तोडणं...
पुणे- काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा देशभराचा अहवाल माझ्याकडे आहे. यामध्ये महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख एवढे लसीचे डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत. १ कोटींपेक्षा अधिक केवळ तीन राज्यांनाच मिळाले आहेत. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र. त्यापैकी ९५ लाख कालपर्यंतचे आहेत, कारण आज थोडे  आणखी वाढले आहेत. १५ लाख ६३ हजार वॅक्सीन शिल्लक आहेत. त्यामुळे यांचं नीट वाटप झालं...
मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी  त्या सोडत नाही.अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा...
पुणे - पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे आणि खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले  दोघे सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस तपसामध्ये घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने,९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर...
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि महात्मा फुले अध्यासन यांच्या वतीने रविवारी महात्मा जोतीराव  फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचे  दुर्मिळ अल्पचरित्र Rare first short biography of Savitribai Phule पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे. या बरोबरच अध्यासनातर्फे आणखी २ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या मुद्रणालयाकडून निवडक १६ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले असून ५००...
पुणे- घर खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील सरकार यांनी केलेल्या विविध उपायांचा चांगला  परिणाम  जानेवारी - मार्च २०२१ च्या पहिल्या तिमाहीत दिसून आला आणि या तिमाहीत भारतातील आठ प्रमुख शहरांत घरांची विक्री ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या तिमाहीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली  असे प्रॉप टायगर या मालमत्ता व्यवहार सल्लागार कंपनीच्या ताज्या...