gtag('js', new Date());
पुणे– पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘मिनी लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. सुरुवातीला यामध्ये रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी आणि दुकानांना ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून...
शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा.सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली.प्रत्येक शालिवाहन शकाला विशिष्ट नाव असते.दर ६० वर्षांनी नावाची पुनरावृत्ती होते.“ वेदांग ज्योतिष” या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी तसेच अनेक शुभ कामांचा शुभारंभ...
🚩ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।  प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।🚩संवत्सर प्रतिपदा! चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे वर्षारंभाचा दिवस. याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रह्मध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी...
पुणे- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. परंतु, हा निर्णय घेताना लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना व कामगार मंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे.काळाजी गरज म्हणून लॉक डाऊन सारखा कटू निर्णय महाराष्ट्र शासनास...
पुणे—राज्यातील वाढलेले कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला विरोधही केला जात आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी सरकारने काही जबाबदारी घ्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. याबाबत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत...
मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची राज्याची परिस्थिती पाहता राज्यात आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये असे वाटत असेल  तर लॉकडाऊन  लावण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही...