लोहगड किल्ला हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लोहगड किल्ला हत्या प्रकरण
लोहगड किल्ला हत्या प्रकरण

पुणे(प्रतिनिधी)–लोहगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या धक्कादायक हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, ती मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली. पोलिसांनी तपासाच्या पुढील व्याप्तीसाठी आणि मोबाईलमधील ‘सांकेतिक भाषेचा’ (कोडवर्ड) छडा लावण्यासाठी आरोपींची आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.

सांकेतिक चॅट्समधून हत्येचा उलगडा

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात तपासातील महत्त्वाचे धागेदोरे सादर केले. पोलिसांनी आरोपी सिया गोयलचा दुसरा मोबाईल जप्त केला असून त्यातील डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात यश आले आहे. या चॅट्समध्ये आरोपींनी एकमेकांशी संवाद साधताना विविध ‘टोपणनावे’ आणि गुढ ‘सांकेतिक भाषेचा’ मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे समोर आले आहे. या सांकेतिक संभाषणांचा नेमका अर्थ काय आणि या कटात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्यासाठी आरोपींची प्रत्यक्षदर्शींसमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून पोलिसांनी बीडमधील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे, ज्याला या संपूर्ण हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .

अधिक वाचा  'सुपर एलनिनो'ची धोक्याची घंटा; भारतीय मान्सूनवर चिंतेचे सावट, जागतिक हवामान संघटनेचा इशारा

कायदेशीर संमतीशिवाय नार्को टेस्ट नाही

पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींची ‘पॉलीग्राफ’ (लाई डिटेक्टर) चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायाधीश ए. एम. विभुते यांनी याबाबतस्पष्ट केले की, आरोपींच्या कायदेशीर संमतीशिवाय त्यांची नार्को किंवा तत्सम कोणतीही चाचणी घेता येणार नाही. दुसरीकडे, बचाव पक्षाचे वकील ॲड. विपुल दूशिंग यांनी पोलिसांच्या कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला. सिया गोयल तपासात पूर्ण सहकार्य करत असून तिचा मोबाईल आधीच पोलिसांकडे आहे, त्यामुळे केवळ संशयाच्या आधारे कोठडी वाढवून मागणे अयोग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love