gtag('js', new Date());
नालासोपारा - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.वंचित...
पुणे- पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेडची, ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. ही गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपले 'सामाजिक दायित्व' म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी भाजपने पुण्यामध्ये दोन हजार ऑक्सीजन बेड आणि दहा हजार रक्ताच्या...
पुणे -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत.स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला असून...
पुणे : प्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 'सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१' जाहीर झाला आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे संचालक दिवंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला.उद्या...
इसवीसन पूर्व ६९६ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला. त्यांचा विवाह यशोदा नामक सुकन्येशी झाला होता. वर्धमान महावीरांना एक मुलगी होती. नंतर वर्धमानांना वैराग्य आले. वडीलभावाच्या संमतीने त्यांनी तिसाव्या वर्षी संन्यास घेतला. त्यानंतर बारा वर्षे तपश्चर्या केली. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. संन्यास घेतल्यानंतर महावीर कर्मार या गावी काही काळ राहिले. तेथे त्यांनी ध्यानाचे...
पुणे- केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातही १ मे ला १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी राज्य शासनाने केली असून ही लस नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १ मेला बोलणार असल्याचे सांगतानाच केंद्र सरकारच्या...