केवल ज्ञानी भगवान महावीर

लेख
Spread the love

इसवीसन पूर्व ६९६ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला. त्यांचा विवाह यशोदा नामक सुकन्येशी झाला होता. वर्धमान महावीरांना एक मुलगी होती. नंतर वर्धमानांना वैराग्य आले. वडीलभावाच्या संमतीने त्यांनी तिसाव्या वर्षी संन्यास घेतला. त्यानंतर बारा वर्षे तपश्चर्या केली. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. संन्यास घेतल्यानंतर महावीर कर्मार या गावी काही काळ राहिले. तेथे त्यांनी ध्यानाचे काही प्रयोग केले. ध्यानासबंधी विशिष्ट आसनांचा ते आग्रह धरत नसत. कधी बसून तर कधी उभे राहून ते ध्यान करत.

 ★ या काळात त्यांनी कायोत्सर्ग मुद्रा साध्य केली. म्हणजे ध्यान करतांना श्वासासारखी सूक्ष्म क्रिया सोडून अन्य सर्व क्रियांचे विसर्जन होय! त्राटक आणि ध्यान यातून कायोत्सर्ग साध्य होतो. या नंतर महावीर दृढभूमी प्रदेशात गेले. तेथे त्यांनी एकरात्री प्रतिमा नामक साधना केली.

★ साधनेच्या या प्रकारात पहिले तीन दिवस उपवास केला जातो, तिसऱ्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात कायोत्सर्ग करून सरळ उभे राहिले जाते, डोळे स्थिर करून उघडझाप बंद केली. भय आणि देहाध्यास नाहीसे करणारी ही साधना आहे.     

 ★ यामध्ये साधक ध्यानाच्या अंतःस्तलात खोल शिरतो, त्याला आतील संस्कारांच्या घडामोडींचा सामना करावा लागतो. भूतकाळाचा अनंत पट समोरून सरकत जातो. त्यावेळी जो अविचल राहतो तो प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करतो आणि जो विचलित होतो तो उन्मत्त व रुग्ण होतो. साधनेच्या अकराव्या वर्षी भगवान महावीर सानुलठ्ठीय गावात विहार करत होते. तेथे त्यांनी भद्रप्रतिमा ध्यान केले. हे ध्यानसत्र सोळा दिवस सोळा रात्री सुरू होते. एकांतस्थानी महावीर ध्यान करत. बसलेल्या अवस्थेत ते पद्मासन, पर्यकासन, विरासन, गोदोहीकआसन, उत्कटासन यांचा अवलंब करत.

★ अशाप्रकारे केवल ज्ञान प्राप्त झाल्यावर प्रभू महावीरांनी जैन दर्शन व साधनेचा उपदेश करण्यास सुरुवात केली. 

तीच महावीर वाणी होय! तेच जैन दर्शनाचे मूळ!!

नमो अरिहंताणम। जय जिनेंद्र।

 – रमा दत्तात्रय गर्गे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *