gtag('js', new Date());
पुणे-नाशिकच्या जेलमधून बाहेर आलेला गुन्हेगार पुण्यात चोरी करत असताना त्याचा  पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पण, जखमी अवस्थेत देखील त्या धाडसी तरुणाने त्याला पकडले आहे. मध्यवस्तीत भरदिवसा हा थरार घडला आहे.अवेज सलीम अन्सारी (23) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी विठ्ठल वामन बोळे (रा. हिंगणे मळा, जळगाव) याला...
पुणे-गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले...
पुणे--कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद...
पुणे—पतीने कामावरून जाताना पाणीपुरी आणली. परंतु, मला न विचारता पाणीपुरी का आणली, असे विचारत पत्नीने वाद घातला. मात्र, त्या वादाचा विपर्यास होऊन पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.प्रतीक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी...
पुणे-पोलिस दलाच्या मोटर परिवहन विभागातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पत्नीचे महिन्याभरापुर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यामधूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या...
पुणे-देशातील जनतेच्या जगण्याच्या खऱ्या समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करून बेजबाबदारपणे धार्मिक विषयांबद्दल बोलणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा देश बचाव आंदोलनाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. अण्णांसारख्या समाजसेवकांनी जनतेच्या मुळ समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे असताना अण्णांसारखी व्यक्ती धार्मिक भावनांवर बोलत आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे आणि अण्णांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारी आहे, असा आरोप...