gtag('js', new Date());
पुणे- येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर ८ मध्ये ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्कच्या बांधकाम साईटवर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला तर १० कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.  जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा...
पुणे--राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य कीर्तनकार बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन केले.हे निषेध आंदोलन पुण्यात संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळीबंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कडून निषेध करण्यात आला.
पुणे- ओबीसींसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी न्याय मागितला. ओबीसींसाठी ४० वर्ष संघर्ष केला, पण वापरा आणि फेकून द्या असेच भाजपचे धोरण असल्याची टीका माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना केली. लालकृष्ण अडवणींचे आज काय झाले? असा प्रश्न उपस्थित करतानाच ओबीसींच्या नेत्यांचा मतांसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपवर...
पुणे : रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी २०२२ ) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा प्रकल्प समितीतर्फ़े सुरु केले जाणार आहेत. या वर्षात जनकल्याण समितीतर्फे पुण्यातील एरंडवणे परिसरात 'सेवा भवन' ही वास्तू साकारणार आहे. अत्यल्प दरातील डायलिसीस केंद्र तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व भोजन व्यवस्था सेवा...
दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असून बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ३०  मार्च या कालावधीत होणार आहे तर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होतील. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, यंदा...
पुणे—कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमाहौप डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे...