gtag('js', new Date());
पुण्यातील गणेशोत्सवात श्री गणरायाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकांना अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. पारंपरिक पद्धतीने आणि घरगुती चवीने तयार होणाऱ्या या मोदकांना दरवर्षी नागरिकांची मोठी पसंती मिळताना दिसते. परंतु, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या युगात अनेक कुटुंबांना घरी मोठ्या प्रमाणावर मोदक तयार करणे वेळेअभावी शक्य होत नाही. अशा ग्राहकांसाठी 'माधुर्य केटरर्स' हा अत्यंत सोयीचा आणि विश्वासार्ह पर्याय ठरत...
ऋषि पंचमी दगडूशेठ अथर्वशीर्ष पठण
पुणे(प्रतिनिधी)--ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. तब्बल ३५ हजार पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष, अथर्वशीर्ष आणि महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण...
पुणे(प्रतिनिधी): गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावन मधील प्रेम  मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीं चा हा नयनरम्य आगमन सोहळा पाहण्याकरता हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण...
नवी दिल्ली:-भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत जागतिक प्रशासनाच्या रचनेत व्यापक आणि टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यासाठी १० महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश असलेला 'ब्रिक्स रिफॉर्म रोडमॅप' तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्सच्या २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी  सध्याची जागतिक प्रशासनाची रचना एका पिरामिडसारखी झाली आहे, जिथे सत्ता आणि निर्णयप्रक्रिया सर्वोच्च ठिकाणी...
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (PTAM)
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील व्यावसायिक शिक्षक आणि कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांत जुन्या आणि मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (पीटीएएम) ने प्रस्तावित महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे नोंदणी व नियमन कायद्यातील तरतुदींचा फेरविचार करून प्रस्तावित मसुदा अंतिम करण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवावी असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.  पीटीएएमला औपचारिक सल्लामसलतीसाठी आमंत्रित करावे आणि संघटनेने सुचविलेल्या दुरुस्त्या व आदर्श कायद्याच्या...
सुमेधा चिथडे व्याख्यान पुणे
पुणे(प्रतिनिधी)--देशाच्या संरक्षणासाठी अखंड सेवारत असणाऱ्या आपल्या सैनिकांना गृहीत धरले जाते. सैन्यासाठी सर्वकाही सरकारने करावे, ही अपेक्षा असते. पण अगदी छोट्या कृतीतूनही आपण प्रत्येकजण आपल्या सैनिकांसाठी खूप काही करू शकतो. फक्त अशा सेवाकार्याचे संस्कार करण्याच्या जबाबदारीचे विस्मरण झाले आहे. आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे आपला प्रवास होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सीमेवरील जवानांसाठी कार्य करणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी रविवारी येथे केले. स्वातंत्र्याचा आपण...