gtag('js', new Date());
पुणे डीजे बंदी जनआक्रोश मोर्चा
पुणे(प्रतिनिधी)--गणेशोत्सवातील डीजेचा वाढता दणदणाट, कानठळ्या बसवणारा आवाज आणि लेझर किरणांच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या असह्य त्रासाविरोधात पुण्यात उस्फूर्त जनआक्रोश पाहायला मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजेविरोधात धाडसी आणि रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या समर्थनासाठी हजारो पुणेकर बालगंधर्व चौकामध्ये एकत्र आले आणि तेथून पुणे महानगरपालिकेपर्यंत एक विराट मोर्चा काढण्यात आला. "नागपुरात कायद्याला मान, सोलापूरला परंपरेचे भान, मग पुण्यातच लाऊडस्पीकरला का...
नागपूर(प्रतिनिधी)-नागपूर जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने एका विमा प्रकरणाचा निपटारा करताना अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी जर विमाधारकाने आपल्या मद्यपानाच्या सवयीची माहिती प्रामाणिकपणे दिली असेल, तर विमा कंपनी नंतर तो विमा दावा फेटाळू शकत नाही, असा स्पष्ट निकाल दिला आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचा कायदेशीर विमा दावा नाकारणे हा विमा कंपनीच्या सेवेतील गंभीर त्रुटी असल्याचा ठपका...
महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्स 2026
पुणे(प्रतिनिधी)--शिक्षण क्षेत्रातून घडणारे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला अपेक्षित असलेले कुशल मनुष्यबळ यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सच्या चौथ्या सोहळ्याचे आयोजन येत्या ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून  करण्यात आले आहे. हा सोहळा पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे रंगणार आहे.जॉबिझ्झाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात शिक्षण आणि उद्योग...
संतोष पंडित अटक पुणे
पुणे(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महापालिकेच्या विधी समिती सदस्य मिताली कुलदीप साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित अश्लील, लैंगिक स्वरूपाची आणि बदनामीकारक वक्तव्ये तसेच व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरवारी मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक देखील केली.याप्रकरणी कोथरूड येथील सारिका राम कांबळे यांनी...
पुणे पोलिस आयुक्त गणेशोत्सव नियम
पुणे(प्रतिनिधी) - गणेशोत्सवात ‘चार बेस, चार टॉप’च्या पुढे ध्वनिक्षेपकाची संख्या वाढविल्यास आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे अशा ध्वनियंत्रणांना परवानगी देणे संयुक्तिक ठरणार नाही. प्रेशर मीड, प्लाझ्मा आणि लेझर लाईट याला बंदी असून गणेश मंडळांनी चार बेस आणि चार टॉपच नियंत्रणात वाजवावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजीत दहीहंडी व गणेशोत्‍स...
विद्यानंद बापट हल्ला पुणे
पुणे(प्रतिनिधी)--पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापराबाबत सातत्याने कायदेशीर आणि सामाजिक आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी सकाळी टिळक रोड परिसरात एका तरुणाने थेट प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला.   माध्यमांशी बापट संवाद साधत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. या...