gtag('js', new Date());
पुणे- राज्यातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह सोळा आमदारांच्या पात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray) यांनी फ्लोअर टेस्टला (floor test ) सामोरे ने जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिति पूर्ववत केली जाऊ शकत नसल्याचे निरक्षण...
पुणे--वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन यांनी आज पुण्यातील महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण पूर्ण करून त्याचे उदघाटन केले. हा उपक्रम वॅबटेकच्या  केअरिंग फॉर अवर कम्युनिटीज  प्रोग्रामचा एक भाग आहे, जगभरात ज्या ठिकाणी वॅबटेक चे कर्मचारी राहतात किंवा काम करतात व अश्या ठिकाणी सामाजिक कार्यात पूर्णपणे योगदान देण्याचा वॅबटेकचा चा प्रयत्न असतो. 
पुणे- करोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेलीय. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली आहे.‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी...
पुणे-बनावट वेबसाईच्या माध्यमातून नापास मुलांना मोठी रक्कम घेऊन पास असल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी  पर्दाफाश केला आहे. या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट देखील तयार केल्याचही या तापासात उघड झालं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यानंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही सांगितलं जात आहे.
पुणे— हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दिनांक १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.डीआरडओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची आज एटीएस कोठडी संपली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी  पुणे सत्र...
पुणे- नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना सोमवारी रात्री पुण्यातील शेवाळवडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांनी एका ब्रीझा कारमधून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या बॅगा आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47) रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही रोकड...