पुण्यातील शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल फाऊंडेशन चा संयुक्त उपक्रम


पुणे–वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन यांनी आज पुण्यातील महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण पूर्ण करून त्याचे उदघाटन केले. हा उपक्रम वॅबटेकच्या  केअरिंग फॉर अवर कम्युनिटीज  प्रोग्रामचा एक भाग आहे, जगभरात ज्या ठिकाणी वॅबटेक चे कर्मचारी राहतात किंवा काम करतात व अश्या ठिकाणी सामाजिक कार्यात पूर्णपणे योगदान देण्याचा वॅबटेकचा चा प्रयत्न असतो. 

वॅबटेकचे इंडिया सोर्सिंगचे वरिष्ठ संचालक, विजय इनामके यांनी नूतनीकरण केलेल्या शाळेचे उद्घाटन केले. त्यांनी क्लस्टर हेड  मारुंजी, सुरेश साबळे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक आनंद राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष श्रीमती अनिता साळुंखे, सदस्य श्रीमती सरिता मुरकुटे आणि चिराग भंडारी (एनोबल संस्थापक) यांच्या उपस्थितीत शाळेच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरण केले.

अधिक वाचा  #खुशखबर-मान्सून केरळात दाखल : महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन

 साजिद इक्बाल, (वाईस प्रेसिडेंट, एच.आर आणि सी.एस.आर) म्हणाले कि, वॅबटेक आपल्या कार्यक्षेत्रातील समाज कल्याणासाठी कटिबद्ध आहे. मला पुण्यातील आमच्या सी.एस.आर उपक्रमांच्या विस्तारामुळे आनंद होत आहे. यावर्षी वॅबटेकने भारतातील ५० शाळांमध्ये सामाजिक कार्य करून बदल घडवून आणला आहे. पुण्यातील दोन शाळांमध्ये पायाभूत सुविधांची सुधारणा उपयुक्त ठरणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित व अतिउत्तम शिक्षणाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे”.

या उपक्रमांतर्गत,पुण्यातील काही विभागामध्ये एक विस्तृत सर्वेक्षण केले गेले, त्यामध्ये पुण्यातील दोन शाळांना अद्यावतीकरण करण्यासाठी निवडण्यात आले व सर्वसमावेशक मूल्यांकन करून शाळा नूतनीकरणाची योजना आखण्यात आली. या कार्यासाठी वॅबटेकने एनोबल सोशल इंनोव्हेशन फौंडेशन सोबत पार्टनरशिप केली, हि संस्था सरकारी शाळांचा अद्यावतीकरण करण्यामध्ये तज्ज्ञ आहे. ज्यांनी बऱ्याच राज्यात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.

अधिक वाचा  पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट: महापालिकेने निर्बंध वाढवले

“शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून आणि शिक्षणासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करून सरकारी शाळांना प्रेमळ आणि समाजाची पहिली पसंती बनवण्याचा संकल्प  एनोबल या संस्थेने केला आहे,” एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन चे संस्थापक चिराग भंडारी म्हणाले कि, “आम्हाला वॅबटेक सोबत पार्टनरशिप केल्याचा अभिमान वाटतो, जे त्यांच्या सी.एस.आर कार्यक्रमांतर्गत शिक्षणाचे स्तर उंचाविण्यासाठी लक्ष केंद्रित करते”.

वॅबटेकचे इंडिया ग्लोबल सोर्सिंग कार्यालय बाणेर, पुणे कार्यरत आहे. ही संस्था वॅबटेक च्या जागतिक आणि देशांतर्गत वेगवेगळ्या कारखान्यांसाठी कॉम्पोनेन्ट्स सोर्सिंग करते. वॅबटेक कंपनी भारतीय रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांना लोकोमोटिव्ह आणि सबसिस्टिम पुरवते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love