महत्वाच्या बातम्या
विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन
News24Pune -0
पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले.ते येथे आयोजित...
अर्थ
‘ज्ञानराधा’ मल्टीस्टेट सोसायटीसाठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आदेश
News24Pune -
नवी दिल्ली (प्रतिनिधी)- ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत.‘ज्ञानराधा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत. याबाबत तक्रारींची संख्या मोठी असल्याने...
क्रीडा
ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान : सचिन खिलारी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--ऑलम्पिक मध्ये मला रौप्यपदक मिळाले त्यामुळे महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान आहे. २०२८ ला येणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये माझ्यासह माझा विद्यार्थीही पदक मिळवील व त्या पदकाचा रंग नक्कीच सुवर्ण असेल, असा विश्वास पॅराऑलिंम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या सचिन खिलारी याने गुरुवारी व्यक्त केला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता सचिन खिलारी याच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
पुणे(प्रतिनिधि)--बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत दारू पाजत सामूहीक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून एक फरार आहे.ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) आणि यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक...
महत्वाच्या बातम्या
समविचारी नेत्यांनी एकत्र येत केली ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा : राज्यात देणार तिसऱ्या आघाडीचा पर्याय
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती' ची घोषणा पुण्यामध्ये केली. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत 'परिवर्तन महाशक्ती' ची घोषणा केली.राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी गुरुवारी पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील...
महत्वाच्या बातम्या
चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--विधानसभेच्या तोंडावर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असून चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार अश्विनी जगताप या हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली, आणि या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार झाल्या. पोट निवडणुकीच्या वेळीच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप...














