gtag('js', new Date());
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे(प्रतिनिधि)— हिंसेला चिथावणी देणाऱ्या व विकृतीने पछाडलेल्या आमदार संजय गायकवाड व अनिल बोंडे यांच्यावर मा. ऊच्च न्यायालयाने व पोलीस प्रशासनाने सुमोटो, अटकेची व गुन्हे दाखल करण्याची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दगाबाजांना घेऊन सरकार स्थापन करून आणि शिधा-ओवाळणी देऊनही, राज्याची जनता ‘महायुतीला’ साथ देत नसल्याचे...
पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता
पुणे(प्रतिनिधि)— गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोल-ताशांच्या निनाद, सुरेल सनई-चौघड्याचे वादन, डीजेच्या तालावर थीरकलेली तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात  पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता झाली.गणेश विसर्जन मिरवणूकीला मंगळवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपती बाप्पाची आरती करून सुरुवात झाली.या नंतर ८ तासात मानाच्या पाचही गणेश...
24 तास उलटूनही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक 24 तास उलटूनही मिरवणूक सुरू आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी अलका टॉकीज चौकात गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांकडून बळाचा वापर झाला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर पुण्यातील इतर मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आल्या परंतु टिळक रोडवरील सिस्टीम सुरू करू न दिल्याने संतप्त झालेल्या मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता...
सुरेल सनईवादन, बँड पथकाचे सुमधूर वादन आणि ढोल ताशांचा गजरात मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन
पुणे(प्रतिनिधी)--सुरेल सनईवादन...बँड पथकाचे सुमधूर वादन... ढोल ताशांचा गजर अन् रांगोळय़ांचा पायघडय़ा अशा भारावलेल्या वातावरणात मानाच्या पाच गणपतींना मंगळवारी निरोप देण्यात आला. पाऊसाने विश्रांती घेतल्याने मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती करून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर...
'दगडूशेठ' च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात
पुणे : लाखो एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री उमांगमलज रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. सलग दुस-या वर्षी दुपारी ४ वाजता दगडूशेठ चे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी झाले. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीच्या वैभवात आणखी भर घातली.श्रीमंत...
'दगडूशेठ' गणपतीला मेरिडियन आइस्क्रीम तर्फे ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीम
पुणे(प्रतिनिधि)- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेशोत्सवात विविध मिष्टांनाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, यंदाच्या उत्सवात मेरिडियन आइस्क्रीम तर्फे चक्क ५१ लिटरचे मोदक आईस्क्रीमचा नैवेद्य बाप्पाला दाखाविण्यात आला.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, मेरिडियन आईस्क्रीम चे निलेश चव्हाण, अशोक चव्हाण, पूजा चव्हाण, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मोदक आईस्क्रीम उत्सवमंडपात उपस्थित तब्बल ७०० गणेशभक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आले.निलेश चव्हाण म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ...