कॅम्पस अॅक्टिववेअरतर्फे विक्रांत मेस्सीची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड

कॅम्पस अॅक्टिववेअरतर्फे विक्रांत मेस्सीची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड
कॅम्पस अॅक्टिववेअरतर्फे विक्रांत मेस्सीची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि अ‍ॅथलिझर फुटवेअर ब्रँड्सपैकी एक कॅम्पस अॅक्टिववेअरने भारतीय अभिनेता विक्रांत मेस्सीला त्यांचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतल्याची घोषणा केली आहे. कॅम्पस आणि विक्रांत मेस्सी यांच्यातील सहयोग हा शैली, बहुश्रुतपणा आणि स्व-प्रकटीकरण यांचे एक अद्वितीय मिश्रण आहे. हे गुणविशेष ब्रँड आणि अभिनेता विक्रांत मेस्सी या दोघांमध्येही प्रतिबिंबित होतात.

विक्रांत मेस्सी त्यांच्या वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन कामगिरीसाठी आणि प्रामाणिक ऑफस्क्रीन व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. टेलिव्हिजनपासून समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कॅम्पस अॅक्टिववेअरच्या भारतातील सर्वात मोठ्या अ‍ॅथलिझर ब्रँड्सपैकी एक बनण्याच्या प्रवासाशी अनुरूप आहे. प्रयोगशीलतेसाठीची त्यांची आवड आणि जमिनीशी जोडलेली वृत्ती कॅम्पस आणि बहुमुखी, उत्कट व प्रामाणिक अशा आजच्या तरुणांच्या मूल्यांशी अगदी जुळते.

अधिक वाचा  वॉल्टर्स क्लुवर तर्फे पुण्यात इनोव्हेशन हब : अद्ययावत सुविधेसह जागतिक तंत्रज्ञान कंपनीचा भारतात विस्तार

या सहयोगावर बोलताना कॅम्पस अॅक्टिववेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल अगरवाल म्हणाले, “विक्रांत त्यांच्या बहुमुखीपणा, वैविध्यपूर्ण कामासाठी ओळखले जातात. आज उदयोन्मुख कलाकार आणि विशेषतः आजच्या तरुणांनी नावाजलेले ते एक सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा साधेपणा आणि सहजपणे सर्वांशी जोडून घेण्याची क्षमता कॅम्पस अॅक्टिववेअरच्या मुख्य मूल्यांचे मूर्त रूप आहे. रोजच्या दिवसाला विक्रांत ज्याप्रमाणे आत्मविश्वासाने आपले व्यक्तिमत्त्व सादर करतात, तसे करण्यासाठी आमच्या ग्राहकांना या सहयोगातून प्रेरणा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

ऑटम विंटर 2024 कलेक्शन आधुनिक, बहुमुखी तरुणांसाठी डिझाइन केले गेले असून, जे बोल्ड, परंतु आरामदायक डिझाइनला महत्त्व देतात. हे कलेक्शन आणि विक्रांत यांचे व्यक्तिमत्त्व यांच्यामध्ये समन्वय साधत ही उत्पादने विक्रांतच्या सहज आणि प्रामाणिक शैलीशी जुळतात.

अधिक वाचा  महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय:सहकार भारतीचे १५ उमेदवार विजयी

कॅम्पस अॅक्टिववेअरबरोबर सहयोग करण्याबद्दल विक्रांत मेस्सी म्हणाले, “शैली ही व्यक्तीच्या खऱ्या स्वत्त्वाचे प्रतिबिंब असते, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि वैयक्तिकतेचा सन्मान करत असताना आरामाला प्राधान्य देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करायला मला खूप आनंद होत आहे. कॅम्पससोबत काम करण्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक भारतीय तरुणांसाठी फॅशन स्टेटमेंट तयार करण्यासाठी ठोस पावले उचलणारा हा एक स्वदेशी ब्रँड आहे.”

कॅम्पस अॅक्टिववेअरचे ऑटम विंटर 2024 कलेक्शन आजच्या तरुणांच्या सतत बदलणाऱ्या गरजांना ध्यानात घेऊन डिझाइन केले गेले आहे. कॅज्युअल स्नीकर्सपासून स्टायलिश अ‍ॅथलिझर शूजपर्यंत विविध जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करत, या कलेक्शनमध्ये भरपूर आराम आणि शैलीदारपणा आहे. हे मल्टी-ब्रँडेड स्टोअर्स, कॅम्पसचे एक्सक्लुझिव आउटलेट्स, Campus.com आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love